गोड गोंडस रूप आणि निरागस व्यक्तिमत्त्व असलेली अन्विता फलटणकर चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेत अभिनय करून, तिने रसिकांच्या मनावर गारुड घातलं आहे. शिवाय ती सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. या ठिकाणी ती तिचे फोटो व व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही.
अन्विताचे सोज्वळतेने भरलेले फोटो तर तुम्ही अनेकदा पाहिलेच असतील. मात्र नुकताच समोर आलेल्या फोटोमध्ये अभिनेत्रीचा हटके अंदाज पाहायला मिळाला आहे. या फोटोमध्ये तिचा स्वॅग चाहत्यांना पाहायला मिळाला आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. या फोटोत तिने एक अंगठीही घातली आहे, ज्यावर ‘नखरेवाली’ असं लिहिलेलं दिसतंय.
हा फोटो शेअर करत अन्विताने कॅप्शनही तसंच स्वॅगमध्ये लिहिलं आहे. तिने लिहिलंय की, “मै अपनी फेव्हरेट हू!” असे म्हणत तिने चाहत्यांना खूपच प्रभावित केलं आहे. या फोटोवर चाहत्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. आतापर्यंत या फोटोवर १३ हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत. तर चाहते कमेंट्सच्या माध्यमातून तिला सांगत आहेत की, आमची फेव्हरेट पण तूच आहेस. (anvita phaltankar share photo and said mai apni favourite hun)
अन्विताच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने नाटकांपासून ते बऱ्याच चित्रपटामध्ये अभिनय करून, रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. तिने रवी जाधव दिग्दर्शिक ‘टाईमपास’मध्ये अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. यानंतर ‘गर्ल्स’ या चित्रपटात ती ‘रुमी’च्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. याशिवाय अन्विताने ‘चतुर चौकडी’ आणि ‘रुंजी’ या मालिकेतही काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘मला माहितीये लोक माझ्या वडिलांचा तिरस्कार करतात…’; #meetoo बाबत आलिया कश्यपने केले तिचे मत व्यक्त