आजकाल धावपळीच्या युगात प्रत्येकाच्या आयुष्यात बऱ्याच अडचणी आणि संकटे येत राहतात. यातली सर्वांची जवळपास सारखीच अडचण म्हणजे पैशांची. आर्थिक अडचणींमुळे लोकांना दु:खाला सामोरे जावे लागते. फक्त सामान्य लोकंच नव्हे तर मोठमोठ्या सेलिब्रिटींनाही अशा अडचणी आहेत. असेही काही कलाकार आहेत, ज्यांनी शेवटच्या काळात पैशांच्या अडचणीमुळे कठीण जिवन जगले आहेत व काहीजन आजही तसं जिवन जगत आहे. चला जाणून घेऊया ते सेलेब्रिटी कोण आहेत.
संतोष आनंद
नुकतेच ‘एक प्यार का नगमा है’ यासारख्या सर्वोत्कृष्ट गाण्याचे लेखक संतोष आनंद हे गायन रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडल’ आले होते. शोमध्ये व्हीलचेअरवर बसलेल्या लेखकाने सांगितले की, आजकाल त्यांच्या आर्थिक अडचणीमुळे ते बिल भरण्यास देखील असमर्थ आहेच. त्यांची प्रकृती पाहून नेहा कक्करने त्यांना 5 लाख रुपये देण्याचे ठरविले.
इंदर कुमार
‘वांटेड’, ‘तुमको भूल ना पायेंगे’ यांसारख्या अनेक हिट चित्रपटात दिसणारा अभिनेता इंदर कुमार याचे 28 जुलै 2017 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अभिनेत्याच्या निधनानंतर त्याची सहकलाकार दीपशिखा नागपाल आणि पत्नी पल्लवी सराफने सांगितले की, अभिनेता आर्थिक संकटातून जात होता. त्याने बॉलीवूडमधील अनेक लोकांकडून मदतीसाठी विनवणी केली पण कोणीही त्याला मदत केली नाही.
महेश आनंद
‘शहंशाह’, ‘गंगा जमुना सरस्वती’, ‘थानेदार’ अशा अनेक हिट चित्रपटांत खलनायकाची भूमिका करून लोकप्रियता मिळवणारे महेश आनंद यांचे 9 फेब्रुवारी 2019 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांचे जवळचे मित्र पहलाज निहलानी यांनी अभिनेता दीर्घकाळ आर्थिक संकटाचा बळी असल्याचे उघड केले होते.
सीताराम पांचाळ
‘पीपली लाइव्ह’, ‘स्लमडॉग मिलियनर’ आणि ‘पान सिंग तोमर’मध्ये दिसणारा अभिनेता सीताराम यांचे ऑगस्ट 2017 मध्ये निधन झाले. सीताराम यांना मूत्रपिंड आणि फुफ्फुसांचा कर्करोग होता, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूच्या आधी, अभिनेत्याचा उपचार बरेच दिवस चालला, ज्यासाठी त्यांच्याकडे पैसेही नव्हते.
मीना कुमारी
बॉलिवूड इंडस्ट्रीची स्टार मीना कुमारी आयुष्याच्या शेवटी खूप कठीण काळातून गेली. ‘पाकीझा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तीन आठवड्यांनंतर ही अभिनेत्री आजारी पडली. कोमात गेल्यावर रूग्णालयात तिचा दीर्घकाळ उपचार चालला. वयाच्या 38 व्या वर्षी जगाला निरोप देणारी ही अभिनेत्रीही आर्थिक संकटाचा बळी ठरली होती.
ए के हंगल
दिग्गज अभिनेते ए के हंगल यांचे 26 ऑगस्ट 2012 रोजी निधन झाले. मुंबईत उपचार सुरू असताना वैद्यकीय बिले भरण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते. या बातमीनंतर त्यांना मदत करण्यासाठी इंडस्ट्रीतील बरेच लोक बाहेर आले होते.
नलिनी जयवंत
नलिनी 1940-50 दरम्यान लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांचे डिसेंबर 2010 मध्ये निधन झाले. शेवटच्या काळात अभिनेत्रीकडे तिच्या हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी पैसे नव्हते.
प्रेक्षा मेहता
‘क्राइम पेट्रोल’, ‘लाल इश्क’ यासारख्या टेलिव्हिजन शोमध्ये दिसणारी अभिनेत्री प्रेक्षा मेहता हिने 25 मे रोजी तिच्या इंदोरमधील घरात गळफास लाऊन आत्महत्या केली. मरण्यापूर्वी ती काम मिळत नसल्यामुळे चिंतेत होती.
आशीष रॉय
टीव्ही अभिनेता आशीष रॉय यांचे मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे नोव्हेंबर 2020 मध्ये त्याचे निधन झाले. या अभिनेत्यावर बर्याच दिवसांपासून उपचार सुरू होते, ज्यामुळे तो आर्थिक संकटाशी झगडत होता. त्याच्याकडे रुग्णालयाची बिले भरण्यासाठीही पैसे नव्हते. याची पुष्टी त्याच्या जवळच्या मित्रांनी केली.(april 2021 ik pyar ka nagma hai songwritersantosh anand is living his life with no money these celebs too have faced financial crieces in last days)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मिर्झापूर फेम अभिनेते शाहनवाज प्रधान यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन
सौंदर्यात मधुबालाला उजवी; सुपरहिट चित्रपट देण्यात मास्टर तरीही मृत्यूनंतर तीन दिवस सडत होता ‘या’ अभिनेत्रीचा मृतदेह