Friday, April 19, 2024

सौंदर्यात मधुबालाला उजवी; सुपरहिट चित्रपट देण्यात मास्टर तरीही मृत्यूनंतर तीन दिवस सडत होता ‘या’ अभिनेत्रीचा मृतदेह

40 व्या दशकापासून ते 60 व्या दशकापर्यंत हिंदी चित्रपटांमध्ये अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे ‘नलिनी जयवंत‘. या दशकामध्ये नलिनी यांनी चित्रपटांत जबरदस्त काम करुन प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच छाप सोडली होती. आजही जेव्हा जेव्हा सौंदर्य आणि अभिनय यांचे उत्तम उदाहरण दिले जाते, तेव्हा तेव्हा नलिनी जयवंत यांचं नाव घेतलं जातं. त्यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1926 मध्ये मुंबई येथे झाला होता. आज नलिनी जयवंत यांचा वाढदिवस. जर आज नलिनी आपल्यामध्ये असत्या तर, त्या त्यांचा 97 वा वाढदिवस साजरा करत असल्या असत्या.

खूपच कमी वयात नलिनी यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आणि आपल्या मनमोहक अदांनी लाखो मनावर अधिराज्य देखील गाजवले. तो काळ असा होता जेव्हा बॉलिवूडमधील सुपरस्टार दिलीप कुमार, अशोक कुमार, देव आनंद त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करत असे.

नलिनी जयवंत यांनी 1941 मध्ये ‘मेहबूब खान’ यांची ‘बहन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘अशोक कुमार’ यांच्या सोबत ‘समाधी’ आणि ‘संग्राम’ या चित्रपटात काम केल्यानंतर त्या खूपच नावारूपाला आल्या आणि प्रत्येकाच्या मनात आपल एक अढळ असं स्थान निर्माण केले. यानंतर नलिनी यांनी जलपरी सलोनी, काफिला, नाज, लकिरे, नो बहार, तुफान मे प्यार कहा, शेरू आणि मिस्टर एक्स या सारख्या चित्रपटात काम करून आपण एक मोठ्या कलाकार असल्याचे चाहत्यांना दाखवून दिले.

1952 मध्ये एका नावाजलेले मॅगजीनने एक ब्युटी पोल घेतले होते. या पोलमध्ये नलिनीने सौंदर्यवती असलेल्या मधुबालांदेखील मागे सारून पहिल्या क्रमांकाचे स्थान पटकावले. खर पाहायला गेल्यास, नलिनी यांना कधी कामाची कमी नसायची, परंतु शेवटच्या क्षणी मात्र त्यांच्या सोबत त्यांचे कुटुंब नव्हते आणि फिल्म इंडस्ट्री देखील नव्हती. मृत्यू नंतर 3 दिवस त्यांचा त्यांचा मृत्यूदेह तसाच त्यांच्या घरात सडत होता आणि त्यांच्या मृत्यूबद्दल त्यांच्या कुटुंबाला काहीच कल्पना नव्हती.

अभिनेत्री नलिनी जयवंत यांनी 2 लग्न केली होती. त्यांचे पहिले पती दिग्दर्शक ‘विरेंद्र देसाई’ हे होते. त्यांनी 1945 साली ‘विरेंद्र देसाई’ यांच्यासोबत लग्न केले परंतु 3 वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 1960 मध्ये त्यांनी अभिनेता ‘प्रभू दयाल’ यांच्यासोबत लग्न केले आणि 2001 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.(bollywood birthday special know here nalini jaywant life unkown facts)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नाैदल अधिकाऱ्याच्या मुलीने 14 वर्षात केले 19 चित्रपटांमध्ये काम, वाचा अभिनेत्रीचा रंजक प्रवास

मिर्झापूर फेम अभिनेते शाहनवाज प्रधान यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन

हे देखील वाचा