Wednesday, February 4, 2026
Home बॉलीवूड काय सांगता! एका पाकिस्तानी अभिनेत्रीसाठी राजीव कपूरशी भिडला होता सलमान खान, वाचा तो किस्सा

काय सांगता! एका पाकिस्तानी अभिनेत्रीसाठी राजीव कपूरशी भिडला होता सलमान खान, वाचा तो किस्सा

बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार ‘राजीव कपूर’ यांचे मागच्याच महिन्यात 9 फेब्रुवारीला निधन झाले. त्यांच्या मृत्यूची बातमी सर्वांनाच धक्का देणारी होती. राजीव कपूर हे 58 वर्षांचे होते. त्यांना हृदयविकाराचा धक्का‌ आला. त्यांना तेथील जवळच्या रुग्णालयात दाखल केले होते, परंतु तिथेच त्यांचा मृत्यू झाला.

अभिनेता राजीव कपूर यांनी 2001 मध्ये आर्किटेक्ट आरती सभरवालसोबत लग्न केले होते. परंतु काही वैयक्तिक गोष्टींवरून त्यांच्यात वाद झाला आणि त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. 2003 मध्ये त्यांनी कायदेशीर प्रक्रियेने घटस्फोट घेतला. त्यांच्या आयुष्यातील असाच एका किस्सा आज आम्ही सांगणार आहोत, जेव्हा त्यांच्यात आणि भाईजान सलमान खानमध्ये एका पाकिस्तानी अभिनेत्रीवरून हातापायी झाली होती.

माध्यमातील वृत्तांनुसार, ऋषी कपूर यांच्या ‘हीना’ या चित्रपटाची आणि सलमान खानच्या ‘सनम बेवफा’ या चित्रपटाची शूटिंग एकाच जागेवर चालू होती. दोन्ही चित्रपटाच्या टीमने एकाच हॉटेलमध्ये मुक्काम केला होता. शूटिंग चालू असताना मध्येच राज कपूर यांचे निधन झाले. विशेष म्हणजे, ते हा चित्रपट बनवत होते. त्यांच्यानंतर ऋषी कपूर आणि रणधीर यांनी या चित्रपटाचे उरलेले काम पूर्ण केले. या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री जेबा बख्तियार ही होती. सलमान खानने एकदा रात्री तिला डिनरसाठी बोलावले होते.

राजीव कपूर यांना जेव्हा ही बातमी समजली, तेव्हा त्यांना खूपच राग आला. कारण त्यांना असे वाटत होते की, जेबाचे नाव इतर कोणासोबत जोडले जाऊ नये. जेव्हा ती सलमान खानसोबत जेवायला गेली, तेव्हा राजीव कपूर तिथे गेले आणि त्याच टेबलवर बसले जिथे सलमान आणि जेबा बसलेली होती. त्या दोघांच्या बोलण्या-बोलण्यात वाद एवढा वाढला की, त्या दोघांची हातापायी झाली.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा

-अमिताभ, धर्मेंद्र यांच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्रीने केले तारुण्यातील सुंदर फोटो शेअर, होतायत जोरदार व्हायरल

-परी म्हणू की सुंदरा..! पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये मराठमोळी अभिनेत्री दिसतेय जणू स्वर्गातील अप्सरा

-शर्टलेस सलमान खानसोबतचा फोटो शेअर करून अर्पिता खानने दिला जुन्या आठवणींना उजाळा

हे देखील वाचा