अमिताभ, धर्मेंद्र यांच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्रीने केले तारुण्यातील सुंदर फोटो शेअर, होतायत जोरदार व्हायरल

Nasifa alI khan share her younger photos on Instagram


बॉलिवूड कदाचित असा एकही कलाकार नसेल, जो सोशल मीडियाचा वापर करत नाही. कारण जग जसजसे पुढे जाते, कलाकार त्यानुसार वागू लागतात. सध्याच्या काळात कलाकारांचा सोशल मीडियावरील वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या कलाकारांमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री नफिसा अली यांचाही समावेश आहे. नफिसा यांनी आपल्या तारुण्यातील फोटो शेअर केले आहेत. आता हे फोटो भलतेच व्हायरल होत आहेत.

नफिसा यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर आपले जुने फोटो शेअर केले आहेत. त्यांनी फोटो शेअर करत लिहिले की, “मी जेव्हा 20 वर्षाची होते, तेव्हाचे हे फोटो आहेत.”

त्यांच्या या फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा अक्षरश: पाऊस पडतोय. डिझायनर फराह अली खानने या फोटोवर कमेंट केली आहे की, ‘तुम्ही तेव्हाही खूप सुंदर होता आणि आजही तितक्याच सुंदर आहात.’

त्यांच्या  अनेक चाहत्यांनी देखील या फोटोवर कमेंट केली आहे. एकाने “खूप सुंदर, तुमच्या चेहऱ्यावरून नजर हटत नाहीये.” अशी कमेंट केली, तर दुसऱ्याने “तुम्ही खूपच सुंदर दिसत आहात,” अशी कमेंट केली आहे. त्यांच्या या 10 फोटोमध्ये त्या खूपच तरुण आणि सुंदर दिसत आहेत.

नफिसा आपल्या परिवारासोबत गोव्यामध्ये राहतात. इंस्टाग्रामवरून त्या गोव्यातील निसर्गरम्य दर्शन सगळ्यांना देत असतात. नफिसा यांनी प्रसिद्ध पोलो खेळाडू रिटायर्ड कर्नल आरएस सोढी यांच्यासोबत लग्न केले आहे. त्या दोघांना 2 मुली आणि 1 मुलगा आहे.

‘जुनून’ या चित्रपटातून नफिसा यांनी आपल्या करिअरला सुरूवात केली होती. त्यांनी संपूर्ण चित्रपटसृष्टीत केवळ 9 चित्रपट केले. परंतु त्यांनी खूपच मनापासून काम करून आपली ओळख निर्माण केली. त्यांनी ‘शशी कपूर’, ‘अमिताभ बच्चन’, ‘धर्मेंद्र’, ‘सलमान खान’ या दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. सोबतच ‘मेजर साहब’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या पत्नीची भूमिका त्यांनी निभावली होती. नसिफा अली यांनी 1976 मध्ये ‘मिस इंडिया’चा पुरस्कार जिंकला आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा

-परी म्हणू की सुंदरा..! पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये मराठमोळी अभिनेत्री दिसतेय जणू स्वर्गातील अप्सरा

-शर्टलेस सलमान खानसोबतचा फोटो शेअर करून अर्पिता खानने दिला जुन्या आठवणींना उजाळा

-‘मिर्झापूर’ वेबसीरिजनंतर श्रिया पिळगावकर ‘या’ दाक्षिणात्य चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला, साकारणार पत्रकाराची भूमिका


Leave A Reply

Your email address will not be published.