Wednesday, April 23, 2025
Home अन्य जेव्हा कपिलच्या लाईव्ह शोमध्ये घडतो असा काही प्रकार की, सर्वांनाच फुटतं हसू; पाहा मजेशीर व्हिडिओ

जेव्हा कपिलच्या लाईव्ह शोमध्ये घडतो असा काही प्रकार की, सर्वांनाच फुटतं हसू; पाहा मजेशीर व्हिडिओ

‘द कपिल शर्मा शो’ या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा त्याच्या कॉमेडीने सर्वांनाच हसवत आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणणारा हा कार्यक्रम जगप्रसिद्ध कॉमेडी कार्यक्रमांपैकी एक आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा कार्यक्रम बंद होण्याच्या चर्चांना उधाण येत होते. बॉलिवूडमधील कित्येक मंडळी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला प्रथम प्राधान्य देत असतात. ज्यात अनेक नावाजलेल्या दिग्गजांनी हजेरी लावली आहे. हेच या कार्यक्रमाचे प्रसिद्ध होण्यामागचे मुख्य कारण म्हटले तर वावगे ठरणार नाही.

आपल्या सर्वानाच माहीत आहे की, या कार्यक्रमाची स्क्रिप्ट अगोदरच तयार केली जाते, पण काही वेळा असे घडून जाते जे या स्क्रिप्टचा भागही नसतो. त्यामुळे आलेल्या पाहुण्यांसमोर एकच गोंधळ उडून जातो. अशीच एक घटना या या कार्यक्रमाच्या चित्रीकरणादरम्यान घडली. ज्यामुळे सर्वांनाच आपले हसू आवरता येत नाही.

या कार्यक्रमात एकदा बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तर यांना पाहुणे कलाकार म्हणून बोलावण्यात आले होते. सर्व गोष्टी अगदी सुरळीत चालू होत्या. फरहान आणि प्रियंका यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा यात होत होत होता. ते दोघे कपिलच्या टीमसोबत खूप सारी मजा- मस्ती करत होतेच आणि आपले सिक्रेट सांगत होते. कार्यक्रमाच्या चित्रीकरणादरम्यान कपिल शर्मा ज्या सोफ्यावर बसला होता, त्या सोफ्याचा एक पाय अचानकपणे तुटला. हे दृश्य पाहून सर्वजण प्रथम आश्चर्यचकित झाले, परंतु दुसर्‍याच क्षणी जोरजोरात हसायला लागले. परंतु यात आश्चर्याची गोष्ट ही आहे की कपिलने हा सोफा न बदलता तुटलेल्या सोफ्यावरच बसून सर्व चित्रीकरण पूर्ण केले.

पाहुणे कलाकार म्हणून आलेल्या प्रियांका आणि फरहानने त्या दरम्यान अनेक गोष्टींचा खुलासा केला. प्रियांका आपल्या लग्नानंतर पहिल्यांदा या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यात ती लग्नानंतर काय काय मिस करतेय हे सर्व कपिलसोबत शेयर करत होती. इतकेच नव्हे तर ती आपले लग्नानंतरचे जीवन, रॉयल लग्न, आणि आपल्या मागणी प्रोजेक्टबद्दल बोलत होती.

या कार्यक्रमात तिने आपल्याला पाणी पुरी खायची इच्छादेखील व्यक्त केली होती, कारण यूएसमध्ये पाणीपुरी खायला मिळत नव्हते, असे तिने सांगितले. त्यावेळी कपिलने अक्षरश: पाणीपुरीची गाडीच सेटवर मागवली होती, तेव्हा सर्वच पाहुण्या कलाकारांनी पाणीपुरीवर चांगलाच ताव मारला होता.

आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत प्रियंकाने एक किस्साही शेअर केला होता. ज्यात तिला मिट्टू नावाने सर्व हाक मारायचे असे सांगितले. हे नाव तिच्या आत्याने ठेवले होते. आपल्या आजूबाजूच्या लोकांवर मिमिक्री करत असल्याने तिला हे नाव पडले, असे ती सांगत होती.

लॉकडाऊनच्या दरम्यान ‘द कपिल शर्मा शो’ पूर्णपणे थांबविण्यात आला होता. त्या काळात या कार्यक्रमाचे पुनः प्रसारण होत होते. चार महिन्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये या कार्यक्रमाच्या शूटिंगला पुन्हा सुरुवात केली. पण फेब्रुवारी महिन्यात हा कार्यक्रम बंद झाला. हा कार्यक्रम एका नवीन स्वरूपात आणत असल्याच्या चर्चा होत आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-वाह रे वाह! पावरी ट्रेंडमध्ये सहभागी झाले अनुपम खेर, वाढदिवस साजरा केला हटक्या अंदाजात

-…अन् कॉमेडीअन सुनील ग्रोव्हरच्या घरात झाली दह्याची चोरी, माकडाने असा साधला डाव

-बाप करण जोहर झाला भावनिक, मुलगा यश व मुलगी रुहीचा व्हिडीओ केला शेअर

हे देखील वाचा