बाप करण जोहर झाला भावनिक, मुलगा यश व मुलगी रुहीचा व्हिडीओ केला शेअर


निर्माता, अभिनेता तसेच दिग्दर्शक अशा अनेक रुपात आपली स्वतःची ओळख निर्माण करणारा करण जोहर हा बॉलीवूडमधील एक दिग्गज व्यक्ती म्हणून ओळखळा जातो. नेहमीच कोणत्या ना कोणत्या विषयामुळे तो चर्चेत असतो, परंतु त्याची सर्वाधिक चर्चा तेव्हा झाली जेव्हा त्याने जुळ्या मुलांचे पालकत्व स्वीकारले. करण सतत आपल्या सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. आपल्या मुलांचे फोटो तो चाहत्यांच्या भेटीला घेऊन येत असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो नेहमी आपल्या मुलांसोबत क्वालिटी टाइम व्यतीत करतो.

करण जोहरची दोन्हीही मुलं फार गोड आहेत. मग तो यश असो व रुही. आपल्या सोशल मीडियावरवर त्याने बऱ्याचदा त्यांचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. त्यात ते खूप मज्जा मस्ती करत असताना दिसत असतात. नुकताच त्याने इन्स्टाग्रामवर आपल्या मुलांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात ते खूप गोंडस दिसत आहेत. जो कमी वेळातच खूप व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओत यश रुहीच्या मांडीवर डोके ठेऊन झोपला आहे, आणि रुही तिच्या भावासाठी प्रेमाने अंगाईगीत गात आहे. शेवटी ती यशला गुड नाईट बेबी असं बोलते तर यश तिला गुड नाइट मम्मी असं बोलताना दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट होताच वेगाने व्हायरल झाला, ज्याला लोकांनी खुप पसंत केले. सामान्य लोकच नव्हे तर दिग्गज कलाकारांनी देखील या व्हिडिओला पसंती दर्शवून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या व्हिडिओ पोस्ट करून करणने एक भावनिक कॅप्शन लिहिले आहे. त्यात तो लिहिती की, रुही आईची भूमिका चांगल्या प्रकारे साकारत आहे. आपल्या भावावर एका लहान मुलासारखे प्रेम व्यक्त करत आहे. तिने साकारलेली आईची भूमिका ही फार मोलाची आहे. बहिणीच्या प्रेमापुढे बाकीच्या सर्व गोष्टी व्यर्थ आहेत.

आपल्या सोशल मीडियावर तो आपल्या मुलांचे फोटो फार कमी वेळा टाकतो, पण जेव्हा टाकतो तेव्हा ते चाहत्यांच्या पसंतीस पडल्याशिवाय राहत नाहीत. असे अनेक फोटो आहेत ज्याच्यामुळे हे दोघे अनेकदा लाईमलाईट मध्ये आले आहेत. अनेकदा तो आपल्या मुलांसोबत मस्ती करताना दिसला आहे, याशिवाय कोरोना काळात तर त्याने आपल्या या दोन मुलांसोबत टाकलेले फोटो सर्वांच्या चर्चेचा विषय बनले होते. सर्वच त्यांना भरभरून प्रेम देत होते.

करणप्रमाणेच असे अनेक प्रसिद्ध चेहरे आहेत ज्यांनी सरोगसीद्वारे पालकत्व स्वीकारले आहे. ज्यात तुषार कपूर, एकता कपूर, अमीर खान, श्रेयस तळपदे यांचे नाव घेतले जाते. करण जोहरने २०१७ साली सरोगसीद्वारे आपल्या मुलांना जन्म दिला होता. अंधेरीमधील मसरानी हॉस्पिटलमध्ये ह्या जुळ्या मुलांचा जन्म झालेला आहे. आपल्या दिवंगत आई वडिलांच्या नावावरून त्याने आवल्या मुलांचे नाव ठेवले असल्याचे बोलले जात आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.