Saturday, July 6, 2024

आणि रेडियो स्टेशनमध्ये अनुष्का-रणबीर कपूरमध्ये जुंपली होती, अनुष्काने तर थेट…

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा काही दिवसांपूर्वीच आई बनली आहे. 11 जानेवारीला तिने वामिका नावाच्या गोंडस मुलीला जन्म दिला. आजकाल अनुष्काचे पूर्ण लक्ष तिच्या मुलीकडे आहे, यामुळे ती सोशल मीडियावर फारशी सक्रिय दिसत नाही. अशा परिस्थितीत तिचा एक जुना व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेता रणबीर कपूर देखील तिच्यासोबत दिसत आहे.

अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूर हे दोघेही बॉलिवूडच्या सर्वाधिक पसंत केल्या जाणाऱ्या कलाकारांपैकी एक आहेत. करण जोहरच्या ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटात हे दोघे एकत्र दिसले होते. हा थ्रोबॅक व्हिडिओ चित्रपटाच्या प्रोमोशन दरम्यान झालेल्या एका रेडिओ शोचा आहे.

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, अनुष्काने रणबीरला चापट मारलीय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे आणि चांगलाच पसंत केला जात आहे.

खरं तर, रणबीर कपूर अनुष्काला कशाबद्दल तरी त्रास देत होता. मग अभिनेत्री चिडते आणि रणबीरच्या गळ्यावर पेनने काहीतरी लिहायला लागते. सुरुवातीला तिने रणबीरला चापट मारली. त्यानंतर नकार देऊनही त्याचे ऐकत नाही आणि त्याच्या गळ्यावर लिहूनच शांत बसते. हा मजेदार व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडल्याचे दिसून येते.

नुकतेच समोर आलेल्या माहितीनुसार रणबीर कपूरला कोरोना झाला आहे. याची माहिती त्याची आई नीतू कपूर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे. ही बातमी येताच चाहते रणबीरसाठी प्रार्थना करत आहेत. एवढेच नाही तर चाहत्यांना आलियाचीही चिंता आहे. आलियाचे चाहतेही तिला कोरोना चाचणी करण्याचा सल्ला देत आहेत.

दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विराट कोहलीने मुलगी वामिका आणि पत्नी अनुष्काचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. फोटोसह विराटने एक सुंदर कॅप्शनही लिहिले. आपली मुलगीसुद्धा अनुष्कासारखी व्हायला हवी, असे त्याचे म्हणणे आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पटौदी घराण्याचा छोटा नवाब पुन्हा एकदा चर्चेत, गोंडस फोटोने वेधले चाहत्यांचे लक्ष

-कुणी तरी येणार येणार गं! कन्नड अभिनेत्रीचे महिला दिनानिमित्त भन्नाट फोटोशूट, इंस्टाग्रामवर झलक केली शेअर

-‘विकी कौशलने मला असे करण्यास भाग पाडलेे’, म्हणत समंथाने जबरदस्त व्हिडिओ केला शेअर

हे देखील वाचा