Sunday, May 26, 2024

केएल राहुलसोबत लग्नाच्या बातम्यांवर अथिया शेट्टीने सोडले मौन, पहिल्यांदाच मीडियामध्ये म्हणाली…

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीची (Suniel Shetty) मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) तिच्या कथित नात्यामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. यापूर्वी समोर आलेल्या बातम्यांमध्ये असा दावा करण्यात आला होता की, अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) या वर्षाच्या शेवटी डिसेंबरमध्ये लग्न करणार आहेत. त्याचवेळी आता अभिनेत्री अथिया शेट्टीने तिच्या लग्नाच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली आहे. अलीकडेच एका मुलाखतीत, अभिनेत्रीने सांगितले की, अशा अफवा ऐकून ती त्यांच्यावर हसते

खरं तर, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, अथिया आणि केएल राहुलने वांद्रे येथील एका बांधकामाधीन इमारतीत स्वतःसाठी घर बुक केले आहे. अशा परिस्थितीत आता या वृत्तांवर प्रतिक्रिया देताना अथिया म्हणाली की, ती नवीन घरात जात आहे हे खरे आहे. पण ती तिचे आई-वडील सुनील शेट्टी- माना शेट्टी आणि भाऊ अहान शेट्टी यांच्यासोबत नवीन घरात शिफ्ट होत आहे. (athiya shetty breaks silence on the news of marriage with kl rahul)

एका वेबसाईटशी बोलताना अभिनेत्री म्हणाली, “मी दुसऱ्या कोणासोबत नवीन घरात जात नाही, तर माझ्या आई-वडिलांसोबत जात आहे! या नवीन घरात मी आणि माझे कुटुंब एकत्र राहणार आहोत.” अथिया आणि तिचे कुटुंब सध्या दक्षिण मुंबईतील त्यांच्या अल्टामाऊंट रोडजवळील घरात राहतात. यादरम्यान अभिनेत्रीने केएल राहुलसोबतच्या लग्नाच्या बातम्यांबाबतही चर्चा केली. अथिया म्हणाली, “मी यापैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देत नाही. मी या सगळ्याला कंटाळले आहे, आता मी फक्त या बातम्यांवर हसते. लोकांना जे काही विचार करायचे आहे, ते विचार करू द्या.”

यापूर्वी अथियाचा भाऊ अहान यानेही अभिनेत्री आणि क्रिकेटरच्या लग्नाच्या अफवांचे खंडन केले होते. एका वेबसाईटशी बोलताना अहान म्हणाला होता की, “अशी काहीही योजना नाही, या सगळ्या अफवा आहेत. लग्नच नाहीये, तर आम्ही तुम्हाला डेट कशी सांगू? एंगेजमेंटही झालेली नाही. सध्या तरी असं काही नाहीये. काही प्लॅन नाहीत. शिवाय पुढच्या काही महिन्यांत लग्नाचेही प्लॅन नाहीत.”

विशेष म्हणजे, अथिया आणि केएल राहुलच्या नात्याबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत आहेत. दोघांनाही अनेकदा एकत्र पाहून चाहते त्यांच्या नात्याबद्दल अनेक अंदाज लावत होते. मात्र, या जोडप्याने ‘तडप’च्या प्रीमियरमध्ये त्यांचे नाते ऑफिशियल केले होते.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर अथिया शेवटची २०१९ मध्ये ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत दिसली होती. त्याचबरोबर ती सध्या दोन प्रोजेक्टवर काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा