Thursday, April 18, 2024

‘या’ दिग्गज गायकाच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये पोलिसांची एन्ट्री, स्टेजवर जात गायकाला गाणे गाण्यापासून रोखले

ए आर रहमान म्हणजे संगीत क्षेत्राला पर्यायाने मनोरंजनविश्वाला मिळालेले एक वरदानच आहे. त्यांनी त्यांच्या दमदार संगीताने देशासोबतच परदेशातही लोकांना भुरळ पडली आहे. रेहमान हे त्यांच्या गाण्यांमधून चाहत्यांना भेटतच असतात. यासोबतच ते देशविदेशात विविध कॉन्सर्ट देखील घेतात. सध्या रेहमान त्यांच्या एका कॉन्सर्टमुळेच चर्चेत आले आहे. नुकताच त्यांचा एक कॉन्सर्ट पुण्यामध्ये झाला. मात्र हा कॉन्सर्ट सुरु असताना मधेच पोलिसांनी एन्ट्री मारली आणि कॉन्सर्ट मधेच थांबवला.

प्राप्त होणाऱ्या माहितीनुसार ३० एप्रिल रोजी पुणे येथे राजा बहादूर मिल परिसरात ए आर रेहमान यांचा लाइव्ह कॉन्सर्ट होता. मोठ्या संख्येने लोकं त्याच्या कॉन्सर्टला हजर होते. रेहमानने त्याच्या आवाजाने तिथे असलेल्या सर्व प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत होते. संध्याकाळी ८ वाजता सुरु झालेला कार्यक्रम रात्री १० वाजता संपणे अपेक्षित होते, मात्र १० नंतरही कॉन्सर्ट सुरु असल्याने पोलिसांनी एन्ट्री घेतली.

पुण्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्टेजवर जाऊन हा कार्यक्रम बंद केला. रेहमान हे त्यांचे दिल से सिनेमातील ‘छैंया छैंया’ हे गाणे गात असतानाच पोलिस अधिकाऱ्यांनी मंचावर येऊन रेहमानला घड्याळात किती वाजलेत याची आठवण करून दिली. तरीदेखील कार्यक्रम सुरूच होता. कार्यक्रम बंद करा अन्यथा कारवाई करू अशी ताकीद देखील दिली. त्यानंतर लगेच रेहमान यांनी पुणेकरांचे आभार मानले आणि ते खाली उतरले. अशा पद्धतीने कॉन्सर्टमधेच बंद झाल्यामुळे पुणेकर मात्र चांगलेच निराश झाले.

यानंतर पुणे पोलिसांनी एक परिपत्रक जारी करत सांगितले की, “ए आर रेहमान हे त्यांचे शेवटचे गाणे गात होते आणि गाणे गाताना त्यांना वेळेचे भानच राहिले नाही आणि तायतच १० वाजून गेले. त्यानंतर आमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना वेळेबद्दल सांगितले आणि त्यांनी लगेच त्यांचे गाणे बंद केले.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अनुराग बसूने कंगनाला दिली ‘अशी’ ट्रेनिंग, इंडस्ट्रीत 17 वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनेत्रीला आठवले जुने दिवस

सलमान खान लग्नासाठी नाही, तर मुलासाठी करतोय प्लॅनिंग; म्हणाला, ‘कायदा बदलला नाही, तर…’

हे देखील वाचा