Monday, October 14, 2024
Home बॉलीवूड सुखी संसार मोडून गर्लफ्रेंडसोबत राहत होते ‘हे’ बॉलिवूड कलाकार, नावे पाहून तुम्हीही व्हाल थक्क

सुखी संसार मोडून गर्लफ्रेंडसोबत राहत होते ‘हे’ बॉलिवूड कलाकार, नावे पाहून तुम्हीही व्हाल थक्क

बॉलिवूड कलाकारांच्या चित्रपटांची जितकी सोशल मीडियावर चर्चा होत असते. तितकीच त्यांच्या प्रेमप्रकरणाचीही जोरदार चर्चा होताना दिसत असते. चित्रपटांव्यतिरिक्त बॉलिवूड स्टार्स त्यांच्या जीवनशैलीमुळे अनेकदा चर्चेत राहतात. त्‍यांच्‍या पर्सनल लाईफबद्दल जाणून घेण्‍याची चाहत्‍यांनाही उत्‍सुकता आहे. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला अशा चित्रपट कलाकारांबद्दल सांगणार आहोत जे त्यांच्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. चला पाहूया कोण आहेत ते कलाकार.

अरबाज खान (Arbaaj Khan) – या यादीत सलमान खानचा भाऊ आणि अभिनेता अरबाज खान पहिल्या क्रमांकावर आहे. मलायका अरोरासोबत घटस्फोट घेतल्यानंतर तो पुन्हा प्रेमात पडला. तो अनेकदा त्याची गर्लफ्रेंड जॉर्जियासोबत दिसतो. मीडिया रिपोर्ट्सच्या दाव्यानुसार, अभिनेता त्याच्या गर्लफ्रेंडसोबत राहतो.

अर्जुन रामपाल (Arjun Rampal) – बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आतापर्यंत अनेक हिंदी चित्रपटांमध्ये दिसला आहे. मात्र, त्याची आतापर्यंतची कारकीर्द तितकीशी चांगली राहिलेली नाही. अभिनेत्याने 2019 मध्ये मेहर जेसियापासून घटस्फोट घेतला. यानंतर तो गॅब्रिएला डेमेट्रियाडिससोबत रिलेशनशिपमध्ये आला. दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. गॅब्रिएला आणि अर्जुन यांना एक मुलगाही आहे.

फरहान अख्तर (Farhan Akhter)-  फरहान अख्तर हा बॉलिवूडमधील प्रतिभावान कलाकारांपैकी एक आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. याशिवाय अभिनयाच्या क्षेत्रातही त्याने आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, घटस्फोटानंतर अभिनेता शिबानी दांडेकरसोबत रिलेशनशिपमध्ये आला आणि दोघांनीही बराच काळ एकमेकांना डेट केले. काही वेळापूर्वीच दोघांनी लग्नगाठ बांधली.

सैफ अली खान–  बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर हे बॉलिवूडचे परफेक्ट कपल मानले जाते. मात्र, सैफचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी अभिनेत्याचे लग्न अमृता सिंगसोबत झाले होते. लग्नाच्या अनेक वर्षानंतर या जोडप्याचा घटस्फोट झाला. यानंतर सैफ आणि करिनाची जवळीक वाढू लागली. बराच काळ लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्न केले. (Arbaaz Khan and Arjun Rampal broke the happy life and lived with their girlfriends)

आधिक वाचा-
बाबो! कुणापेक्षा कमी नाय, ड्रामा क्वीन राखी सावंतची संपत्ती ऐकून बसेल हादरा
आदिल आधी ‘इतक्या’ वेळा प्रेमात पडली होती राखी सावंत, जाणून घ्या तिच्या बॉयफ्रेंड्सची लिस्ट

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा