अर्चना पूरन सिंगचा शानदार बंगला पाहून तुम्हीही व्हाल हैराण, अभिनेत्रीने शेअर केले फोटो आणि व्हिडिओ

Archana Puran Singh share her bunglow photo and video on Instagram


टीव्हीपासून ते अगदी बॉलिवूडपर्यंत आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे अर्चना पूरन सिंग. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये अर्चनाने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. हा शो सध्या बंद आहे, तरीही सोशल मीडियावरील तिचा वावर कायम आहे. घरी असली तरीही ती तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करत असते. या वेळी अर्चनाने तिच्या बंगल्याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अर्चना पूरन सिंगने हे फोटो आणि व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये ती तिच्या घरातील प्रत्येक कोपरा दाखवत आहे. ती तिच्या आईसोबत आणि पतीसोबत मस्ती करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये कधी ती त्यांचे गार्डन, तर कधी तिची खोली दाखवत आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडिओवर तिचे चाहते जोरदार कमेंट करत आहेत.

अर्चनाने तिच्या करिअरची सुरुवात 1993 मध्ये आलेल्या ‘वाह क्या बात है’ या मालिकेतून केली होती. या नंतर तिने लागोपाठ ‘जाने भी दो पारो’ आणि ‘श्रीमान-श्रीमती’ या मालिकांमध्ये काम केले. 2005 मध्ये तिने ‘नच बलिये’ या शोमध्ये प्रवेश केला होत. तसेच तिने 2006 मध्ये डान्सिंग बेस्ट रिॲलिटी शो ‘झलक दिखला जा’ या शोला होस्ट केले होते.

अर्चना पूरन सिंगने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये येण्याच्या आधी सोनी टीव्हीवरील लोकप्रिय शो ‘कॉमेडी नाईट्स सर्कस’ या शोला जज केले होते.

यासोबतच तिने ‘लव्ह स्टोरी 2050’, ‘मोहब्बतें’, ‘कृष’, कुछ कुछ होता है’, ‘मस्ती’ आणि ‘बोल बच्चन’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा चित्रपटाच्या सेटवर स्टंट करताना सैफ अली खानला पडले होते १०० पेक्षा अधिक टाके, प्रीति झिंटाने दिली होती साथ

-ज्याचा मराठमोळा सिद्धू लहानपणापासून होता दिवाना; त्याच व्यक्तीबरोबर मिळाली काम करण्याची संधी

-‘पंचम दा’ यांच्या निधनाच्या ४ महिन्यांनंतर बँक लॉकरमध्ये सापडले ‘इतके’ रुपये, पाहून झाले होते सगळेच हैराण


Leave A Reply

Your email address will not be published.