जेव्हा चित्रपटाच्या सेटवर स्टंट करताना सैफ अली खानला पडले होते १०० पेक्षा अधिक टाके, प्रीति झिंटाने दिली होती साथ

Saif Ali Khan talk about his accident during kya kehna hai film


बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि प्रीती झिंटा यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. त्यांच्या प्रत्येक चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री आणि बॉंडिंग प्रेक्षकांना खूपच आवडली होती. त्या दोघांनी 2000 साली आलेल्या ‘क्या कहना’ या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या सेटवर घडलेल्या एका प्रसंगामुळे सैफ आणि प्रीतिची मैत्री झाली होती. जी मैत्री त्यांनी आजपर्यंत जपली आहे.

‘क्या कहना’ या चित्रपटाच्या सेटवर झालेल्या एका घटनेचा खुलासा सैफ अली खानने त्याच्या एका मुलाखतीत केला होता. त्याने सांगितले होते की, “क्या कहना या चित्रपटात मला एक बाईकवर स्टंट करायचा होता. त्यामुळे मी दररोज स्टंट कोरिओग्राफरसोबत जुहू बीचवर सराव करत होतो. हा सीन शूट करण्यासाठी आम्ही खंडाळ्याला गेलो होते. तिथे पाऊस पडत असल्याने चिखल झाला होता. त्यावेळी तिथे प्रीति झिंटा देखील होती. खरंतर हा सीन एकाच शूटमध्ये ओके झाला होता. पण माझ्या सांगण्यावरून तो सीन परत शूट करत होते. परंतु तेव्हा तो स्टंट करताना माझी बाईक जोरात अडकली आणि हवेत उडत तसेच कुठेतरी लांब जाऊन पडली. तिथून एका दगडावर माझे डोके जोरदार आपटले होते.”

सैफ अली खानने पुढे सांगितले की, “या अपघातानंतर मला लगेचच आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यावेळी माझ्या डोक्याला 100 टाके पडले होते. या कठीण परिस्थिती प्रीतिने माझी साथ सोडली नाही. तिनेच डॉक्टरसोबत सगळ्या गोष्टी बोलून ठेवल्या होत्या. आणि मला कशाप्रकारे योग्य उपचार मिळेल याची सोय केली होती.”

या प्रसंगानंतरच प्रीति आणि सैफ अली खान यांच्यातील मैत्री वाढली. ‘क्या कहना’ या चित्रपटानंतर सैफ आणि प्रीतीने ‘दिल चाहता है’, ‘कल हो ना हो’, ‘सलाम नमस्ते’ यांसारख्या चित्रपटात एकत्र काम केले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ज्याचा मराठमोळा सिद्धू लहानपणापासून होता दिवाना; त्याच व्यक्तीबरोबर मिळाली काम करण्याची संधी

-‘पंचम दा’ यांच्या निधनाच्या ४ महिन्यांनंतर बँक लॉकरमध्ये सापडले ‘इतके’ रुपये, पाहून झाले होते सगळेच हैराण

-प्रसिद्ध गायक लकी अली यांचे निधन? जवळची मैत्रीण आणि अभिनेत्रीने दिले स्पष्टीकरण


Leave A Reply

Your email address will not be published.