Sunday, May 19, 2024

रात्री ११ला निर्णय, १२ वाजता तात्यांना गाठलं, बुलेट ट्रेनच्या वेगाने झालं अर्चना पुरणचं लग्न’

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या(Kapil Sharma) कार्यक्रमात अनेक अभिनेते  आणि अभिनेत्री सहभागी होत असतात. या कार्यक्रमात ते त्यांच्या आयुष्यासंबंधित अनेक खुलासे करताना दिसतात. हे खुलासे कधी त्यांच्या भन्नाट लवस्टोरीचे असतात, तर कधी सेटवर झालेल्या अविस्मरणीय प्रसंगाचे असतात. मात्र सध्या या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कपिल शर्माच्याच कार्यक्रमातील सदस्य अर्चना सिंग(Archana singh) तिच्या प्रेमप्रकरणाचा एक भन्नाट किस्सा सांगताना दिसत आहे. काय आहे तो किस्सा चला जाणून घेऊ.

अभिनेत्री अर्चना पुरण सिंग सध्या कपिल शर्माच्या कार्यक्रमात जोरदार धमाल उडवताना दिसत आहे. कार्यक्रमातील अर्चनाच्या भूमिकेला जोरदार पसंती मिळताना दिसत आहे. छोट्या पडद्यावर काम करण्याआधी अर्चनाने अनेक चित्रपटात काम केले होते. मात्र चित्रपटात अपेक्षित यश न मिळाल्याने तिने छोट्या पडद्यावर लक्ष केंद्रित केले. ती सध्या दिर्घकाळापासून कपिल शर्माच्या कार्यक्रमाचा भाग आहे. यामध्ये तिने अलीकडेच कपिल शर्माच्या कार्यक्रमात तिच्या प्रेमप्रकरणाबद्दल बोलताना अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. तिने आणि परमित सेठीने पळून जाऊन लग्न केले होते यावेळी घडलेले अनेक मजेशीर प्रसंग तिने सांगितले आहेत.

कार्यक्रमात कपिल शर्माने ‘परमित सेठीला तुम्ही दोघांनी मंडपात लग्न केले आहे की, पळून जाऊन लग्न केले आहे,’ असे विचारले होते. कपिलच्या या प्रश्नाला उत्तर देताना परमिर म्हणाला की “अर्चनाने मला लग्नासाठी जबरदस्ती केली होती.” यावेळी मधेच तिच्या आणि पती परमित सेठीच्या लग्नाबद्दल बोलताना अर्चना म्हणाली की, “परमितने मला लग्नासाठी प्रपोज केले होते. आणि आम्ही दोघांनी पळून जाऊन लग्न केले आहे.”

त्यावेळच्या गमती सांगताना परमिर सेठने सांगितले की, “आम्ही रात्री ११ वाजता लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि १२ वाजता आम्ही पंडिताला शोधायला सुरूवात केली, ज्यावेळी आम्हाला पंडित भेटले, तेव्हा त्यांनी मुलगी बालिक तरी आहे का, तुम्ही पळून तर आला नाही ना? असा प्रश्न केला तेव्हा मी त्यांना मुलगी माझ्यापेक्षा सुजान आहे तुम्ही काळजी करु नका,” असे सांगितले. मात्र यावेळी पंडितांनी असे लग्न लावता येत नाही, त्याला मुहूर्त काढावा लागतो असे सांगितले आणि दुसऱ्या दिवशी येऊन त्यांनी लग्न लावून दिले.” परमित आणि अर्चनाने सांगितलेला हा किस्सा ऐकूण सगळेच थक्क झालेले पाहायला मिळाले.सध्या त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा