‘धाकड’ सिनेमासाठी अर्जुन रामपालचे गजब ट्रान्सफॉर्मेशन; नवीन लूकमध्ये अभिनेत्याला ओळखणेही झाले कठीण


आपण साकारत असलेली भूमिका खरी आणि परफेक्ट असावी अशी सर्वच कलाकारांची इच्छा असते. आपली भूमिका पडद्यावर योग्य दिसावी, प्रेक्षकांनी त्याचे कौतुक करावे यासाठी कलाकार प्रयत्नशील असतात. कलाकार त्यांच्या भूमिकांसाठी प्रचंड मेहनत घेत असतात. भूमिकेची गरज लक्षात घेऊन कलाकार अनेक गोष्टी शिकतात. स्वतः मध्ये अनेक बदल करतात. वजन वाढवणे, कमी करणे हे तर खूपच सामान्य उदाहरण झाले. मात्र भूमिकेची गरज पाहून कलाकार केस काढतात, केस वाढवतात, वेगवेगळ्या भाषा शिकतात, अनेक गोष्टींचे प्रशिक्षण घेतात. एवढी मेहनत ते फक्त रसिकांसाठीच करतात.

आता अभिनेता अर्जुन रामपालचेच उदाहरण घ्या. अर्जुन अतिशय मोजक्या आणि दर्जेदार सिनेमांमध्ये आपल्याला दिसतो. मधल्या काही काळात तो त्याच्या सिनेमांपेक्षा वैयक्तिक आयुष्यासाठीच चर्चेत होता. मात्र पुन्हा अर्जुनने त्याचे लक्ष कामावर आणले आहे. लवकरच अर्जुन आपल्याला कंगना रणौतच्या ‘धाकड’ या आगामी सिनेमात दिसणार आहे. त्याने त्याच्या या भूमिकेसाठी एक नवीन लूक करून घेतला आहे.

दोन दिवसांपूर्वी अर्जुन प्रसिद्ध हेयरस्‍टाइल‍िस्‍ट आल‍िम हकीमच्या इथे स्पॉट झाला होता. तेव्हा अर्जुनने मीडियाचे कॅमेरे पाहून स्वतः ला लपवले होते. आता मात्र अर्जुनने सोशल मीडियावर त्याच्या नवीन लूकचे काही फोटो पोस्ट केले आहेत. अर्जुन प्‍लेट‍िनम ब्‍लॉन्‍ड लुक स्‍पाइक्‍ड हेयरस्‍टाइल या नवीन लूकमध्ये दिसत आहे. अर्जुनने त्याचे हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले, “एक महत्वाची भूमिका साकारण्यासाठी मला माझ्या मर्यादा थोड्या वाढवाव्या लागल्या आहेत. हे तयार करण्यासाठी मला मदत केल्याबद्दल धन्यवाद आलीम.” सोबतच त्याने धाकड आणि पुन्हा एकदा सुरुवात हे दोन हॅशटॅग वापरले आहे. (arjun rampal platinum blonde hairstyle for dhaakad movie)

अर्जुनाचा हा नवीन लूक त्याच्या फॅन्ससोबतच कलाकारांना देखील आवडला आहे. त्याच्या या लुकवर अनेकजणं कमेंट्स करत असून त्याचे हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील झाले आहे.

सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूनंतर एनसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या बॉलिवूडच्या कलाकारांपैकी अर्जुन देखील एक आहे. शिवाय एप्रिलमध्ये अर्जुन कोरोना पॉझिटिव्ह देखील झाला होता.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मुनमुन दत्ताला वादग्रस्त व्हिडिओवर न्यायालयाकडून मोठा दिलासा; कारवाई घेण्यात आली मागे

-‘बॅरिस्टर बाबू’च्या प्रेक्षकांसाठी खुशखबर; १० वर्षांच्या लीपनंतर, ‘ही’ अभिनेत्री साकारणार मोठ्या बोंदिताची भूमिका

-‘शेरनी’ बनलेल्या विद्याचा परफॉर्मन्स पाहून प्रभावित झाले प्रेक्षक; सोशल मीडियावर बांधले जातायेत अभिनेत्रीच्या कौतुकांचे पूल


Leave A Reply

Your email address will not be published.