‘बॅरिस्टर बाबू’च्या प्रेक्षकांसाठी खुशखबर; १० वर्षांच्या लीपनंतर, ‘ही’ अभिनेत्री साकारणार मोठ्या बोंदिताची भूमिका


टेलिव्हिजनवरील मालिकांना मागील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर महत्व प्राप्त झाले आहे. मालिकांबाबत प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच जिव्हाळ्याचे स्थान असते. टीव्हीवर वेगवगेळ्या चॅनेलवर अनेक मालिका सुरु आहेत. मात्र काही मोजक्या मालिका प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करायला यशस्वी ठरतात. काही वर्षांपूर्वी बालविवाहावर आधारित एक मालिका आली होती. ही मालिका तुफान गाजली. त्यानंतर लहान मुलांवर आधारित मालिकांना प्रेक्षकांचे विशेष प्रेम मिळाले.

सध्या टीव्हीवर ‘बॅरिस्टर बाबू’ नावाची एक मालिका सुरु आहे. बालविवाह आणि विधवा प्रथा या कुरीतींवर आधारित या मालिकेने खूप कमी वेळात भरपूर लोकप्रियता मिळवली. या मालिकेतील सर्व कलाकार खास करून बालकलाकार प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यास यशस्वी झाले आहेत.

लवकरच या मालिकेत १० वर्षांचा लीप येणार आहे. त्यामुळे या मालिकेतील ‘बोंदिता’ हे मुख्य भूमिका असलेले पात्र मोठे झालेले दिसणार आहे. ‘बॅरिस्टर बाबू’ मालिकेत ‘बोंदिता’ हे पात्र १० वर्षाचे असून सध्या ही भूमिका अभिनेत्री औरा भटनागर ही बालकलाकार साकारत आहे. मालिकेत येणार लीप लक्षात घेऊन ‘बोंदिता’ हे पात्र आता मोठे दाखवले जाणार आहे. त्यामुळे या मालिकेत कोणती नवीन अभिनेत्री मोठ्या ‘बोंदिता’चे पात्र साकारणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.

ही भूमिका साकारण्यासाठी अनेक मोठ्या आणि लोकप्रिय अभिनेत्रीची नावे चर्चेत आहे. त्यात ‘गुड्डन तुमसे ना हो पाएगा’ मालिकेत मुख्य भूमिका निभवणाऱ्या कनिका मानचे नाव सर्वात जास्त वर होते. पण आता मिळालेल्या नवीन माहितीनुसार अभिनेत्री आंचल साहूला मोठ्या ‘बोंदिता’च्या भूमिकेसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. (barrister babu now anchal sahu to play bondita role)

आंचल ‘क्यूं उत्थे दिल छोड़ आए’, ‘बेगूसराय’, ‘लाजवंती’, ‘मेरी दुर्गा’ या मालिकांमधून प्रेक्षकांच्या समोर आली आहे. सोबतच तिने ‘मर्दानी २’ आणि ‘गर्लफ्रेंड चोर’ या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. अजून आंचल साहूच्या नावाची अधिकृत घोषणा चॅनेल किंवा प्रोडक्शन हाऊसकडून करण्यात आली नसली तरी लवकरच यावरून पडदा उठेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘शेरनी’ बनलेल्या विद्याचा परफॉर्मन्स पाहून प्रभावित झाले प्रेक्षक; सोशल मीडियावर बांधले जातायेत अभिनेत्रीच्या कौतुकांचे पूल

-नोहा फतेहीने विचित्र अंदाजात घातली बिकिनी; अभिनेत्रीला पाहून वरुण धवनही झाला लोटपोट

-अरर!! ड्रेस एवढा गच्च होतोय की उर्वशी रौतेलाला बसायला देखील होतोय त्रास, एका सेशनमध्ये उडाली फजिती


Leave A Reply

Your email address will not be published.