मुनमुन दत्ताला वादग्रस्त व्हिडिओवर न्यायालयाकडून मोठा दिलासा; कारवाई घेण्यात आली मागे


टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मधील बबिता जी म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता ही सध्या खूपच चर्चेत आहे. तिला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपूर्वी तिने जाती विषयक शब्दांचा वापर केला होता. यानंतर राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रमध्ये तिच्या विरोधात कारवाई दाखल केली होती.

याबाबत आज म्हणजेच शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने सुनावणी केली आहे. या दरम्यान मुनमुनला दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने ही कारवाई थांबवली आहे.

मुनमुनने काही दिवसांपूर्वी मेकअप ट्युटोरियल व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तिने सांगितले होते की, ती लवकरच यूट्यूबवर पदार्पण करणार आहे. त्यासाठी तिला सुंदर दिसायचे आहे. या दरम्यान तिने जाती विषयक शब्दांचा वापर केला होता. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यासोबतच तिला खूप ट्रोल देखील केले होते.

मुनमुनचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिने सर्वांची माफी मागितली होती. तिने सोशल मीडियावर लिहिले होते की, “माझ्या या व्हिडिओमुळे खूप विवाद चालले आहेत. मी एका शब्दाचा वापर केला त्याच्या सर्वांनी चुकीचा अर्थ घेतला. कोणाच्याही भावना दुखाण्याचा दृष्टीने मी हे केली नाही.” तिने पुढे लिहिले की, “मला त्या शब्दांचा अर्थ माहित नव्हता. परंतु मला जेव्हा समजले तेव्हा मी तो पार्ट काढून टाकला होता. मी प्रत्येक जातीचा आदर करते. मी त्या सर्वांची माफी मागते जे माझ्याकडून नकळत दुखावले गेले आहेत.” (Taarak Mehta ka ooltah chashma fame munmun datta get relief from supreme court)

मुनमुन गुप्ता ही मागील अनेक वर्षांपासून ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेत काम करते. यामधील तिचे बबिता नावाचे पात्र सर्वांना खूप आवडते. यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसते.

मुनमुन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोविंग देखील जास्त संख्येने आहे. त्यामुळे तिचा कोणताही फोटो वेगाने व्हायरल होत असतो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘शेरनी’ बनलेल्या विद्याचा परफॉर्मन्स पाहून प्रभावित झाले प्रेक्षक; सोशल मीडियावर बांधले जातायेत अभिनेत्रीच्या कौतुकांचे पूल

-नोहा फतेहीने विचित्र अंदाजात घातली बिकिनी; अभिनेत्रीला पाहून वरुण धवनही झाला लोटपोट

-अरर!! ड्रेस एवढा गच्च होतोय की उर्वशी रौतेलाला बसायला देखील होतोय त्रास, एका सेशनमध्ये उडाली फजिती


Leave A Reply

Your email address will not be published.