Saturday, June 15, 2024

कपूर कुटुंबाच्या सुनेने दिली गाेड बातमी, पुन्हा एकादा हाेणार बाळाचे आगमन

काही दिवसांपूर्वीच कपूर कुटुंबात चिमुकल्याचे आगमन झाले, ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. नीतू कपूरची सून आणि रणबीर कपूरची पत्नी आलिया भट्ट प्रग्नेंट होती. अशात तिने काही दिवसांपुर्वी एका मुलीला जन्म दिला. आता पुन्हा एकदा लवकरच कपूर कुटुंबात नवीन चिमुकल्या पाहुण्याचे आगमन हाेणार आहे. खरे तर, रणधीर कपूर यांची बहीण रीमा जैन यांची सून अनिशा मल्होत्रा ​​जैन प्रेग्नेंट आहे. अलीकडेच, अनिशाच्या बेबी शॉवरचा सोहळा पार पडला, ज्याचा फोटो अनिशा मल्हाेत्राने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. चला तर मग जाणून या कार्यक्रमात काेण उपस्थित हाेतं…

बेबी शाॅवर साेहळ्यात अनिशा (anissa malhotra) हिने रॉयल ब्लू कलरची साडी नेसली होती. ज्यावर पांढऱ्या रंगाचे वर्क आहे, तर अरमानने पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा घातला असून प्रिंटेड जॅकेट परिधान केले हाेते, ज्यात ताे प्रचंड देखना दिसत हाेता. अरमान जैन हा करीना कपूरचा चुलत भाऊ आहे. या नात्यानं करीना अनिशाची वहिनी झाली. करीना कपूरही अनिशाच्या बेबी शॉवरला पोहोचली हाेती. यावेळी तिने पारंपारिक लूक केला हाेता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anissa Malhotra Jain (@stylebyanissa)

करीना कपूर आणि अनिशा मल्होत्रा ​​जैन यांचा हे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. चाहते या फाेटाेंवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. करीनाशिवाय तिचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांनीही अनिशा मल्होत्रा ​​जैनच्या बेबी शॉवरला हजेरी लावली होती.

कपूर कुटुंबाच्या घरी हा एक आनंदाचा प्रसंग होता, अशा परिस्थितीत कपूर कुटुंबाने पॅपराझींनाही मिठाईचे वाटप केले.(armaan jain wife anissa malhotra baby shower bollywood actress kareena kapoor looks gorgeous in function see photos )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बिग बॉस १६ चा विजेता रॅपर एमसी स्टॅनवर सेलिब्रिटीजकडून लाखो रुपयांच्या भेटवस्तूंचा वर्षाव, वाचा कोणी काय दिले

बॉलिवूडमधील अभिनेता आयुष्मान खुराना झाला ‘युनिसेफ इंडिया’चा ब्रँड एम्बेसिडर

हे देखील वाचा