Tuesday, June 18, 2024

बिग बॉस १६ चा विजेता रॅपर एमसी स्टॅनवर सेलिब्रिटीजकडून लाखो रुपयांच्या भेटवस्तूंचा वर्षाव, वाचा कोणी काय दिले

रॅपर एमसी स्टॅन हा बिग बॉस १६ चे पर्व जिंकला आणि अचानक चर्चेत आला. शोमध्ये तो जास्त दिसत नसला तरी कधी कधी भांडणांमध्ये त्याचा सहभाग असायचा. मंडळीचा एक भाग म्हणूनच तो घरात जास्त ओळखला गेला. मात्र जेव्हा त्याने शो जिंकला त्यानंतर त्याच्या लोकप्रियतेत मोठ्या प्रमाणवर वाढ झाली. त्याने लोकप्रियतेच्या बाबतीत सलमान खान, शाहरुख खान, विराट कोहली आदी दिग्गज सेलिब्रिटींना देखील मागे टाकले आहे. बिग बॉसमुळे त्याला ही लोकप्रियता तर मिळाली मात्र बिग बॉस जिंकल्यानंतर त्याच्यावर भरभरून अमाप बक्षिसांचा देखील वर्षाव झाला. सोबतच विविध मोठ्या ब्रँड्सच्या ऑफर देखील त्याला मिळत आहेत.

‘बिग बॉस’च्या मनाच्या चकचकीत ट्रॉफीसोबतच एमसी स्टॅनला ३१ लाख ८० हजार रुपये आणि Hyundai Grand i10 Nios ही गाडीही भेट म्हणून देण्यात आली. प्राप्त माहितीनुसार एमसी स्टॅनला बिग बॉस जिंकल्यानंतर सलमान खानने एमसी स्टॅनला ब्रेसलेट गिफ्ट म्हणून दिले असून, त्याची किंमत १५ लाख रुपये इतकी आहे. तर गायक रॅपर बादशाहने स्टॅनला ५० लाख किंमत असलेली सोन्याची चेन दिल्याची माहिती आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Spotify India (@spotifyindia)

बॉलिवूडमधील यशस्वी दिग्दर्शक असणाऱ्या रोहित शेट्टीने स्टॅनला ४५ लाखांची मिनी कूपर कार भेट म्हणून दिली आहे. तर बिग बॉसमधील स्टॅनचा मित्र आणि स्पर्धक असणाऱ्या अब्दू रोजिकने स्टॅनला सहा लाख किमतीचे घड्याळ दिले आहे. दिग्दर्शक साजिद खानने त्याला तीन लाखांची डायमंड चेन भेट म्हणून दिली आहे.

मुख्य म्हणजे एमसी स्टॅनला त्याच्या गर्लफ्रेंडकडूनही विशेष गिफ्ट मिळाले आहे. स्टॅनची गर्लफ्रेंड असलेल्या बुबाने त्याला तब्बल ४५ लाखांची बीएमडब्ल्यू बाईक गिफ्ट दिली आहे. तर अभिनेत्री निमृत कौरने देखील स्टॅनला अडीच लाखांचे रोलेक्स घड्याळ गिफ्ट केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
स्वराने ट्वीटमध्ये ‘भाऊ’ म्हटल्यानंतर होणाऱ्या ट्रोलिंगला फहादने दिले चाेख उत्तर; म्हणाला, ‘हिंदू-मुस्लिम भाऊ…’

सिद्धार्थ शुक्लाच्या आईचा व्हिडिओ झाला व्हायरल म्हणाल्या, ‘आजही लोकं माझ्यावर…’

हे देखील वाचा