Saturday, October 18, 2025
Home टेलिव्हिजन बिग बॉस फेम पायल मलिकला येत आहेत आत्महत्येचे विचार; म्हणाली, ‘लोक आम्हाला टार्गेट करतायेत’

बिग बॉस फेम पायल मलिकला येत आहेत आत्महत्येचे विचार; म्हणाली, ‘लोक आम्हाला टार्गेट करतायेत’

रिॲलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी 3’ चा फिनाले जसजसा जवळ येत आहे, तसतसे या शोचा विजेता कोण बनणार आणि ट्रॉफी घरी नेणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अलीकडे, ‘बिग बॉस 17’ विजेता मुनव्वर फारुकीही बिग बॉस ओटीटी 3 च्या सेटवर दिसला होता. तर पायल मलिकने आता सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर तिला आत्महत्येचे विचार येत असल्याचा खुलासा केला आहे.

बिग बॉस OTT 3 च्या घरात अरमान आणि त्याची दुसरी पत्नी कृतिका मलिक चर्चेत आहेत. त्याच वेळी, घराबाहेर, यूट्यूबरची पहिली पत्नी पायल मलिक तिच्या वादग्रस्त विधानांमुळे दररोज हेडलाइन बनत आहे. काही दिवसांपूर्वी शोमधून बाहेर पडल्यानंतर पायल मलिकने सांगितले की, पती अरमान मलिकला तिने घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या कुटुंबाकडून होत असलेला तिरस्कार पाहून तिने हा निर्णय घेतला आहे.

मात्र, आता पायल मलिकनेही आपला निर्णय फिरवला आहे. पायलने सांगितले की, तिला मिळणाऱ्या ट्रोलिंगमुळे तिला आत्महत्येचे विचार येत आहेत. पायल म्हणाली, “जगात असे अनेक लोक आहेत ज्यांनी दोनदा लग्न केले आहे, पण त्यांना कुणीही प्रश्न विचारत नाही? त्यांच्यावर लोक कमेंट का करत नाहीत? ते फक्त आम्हाला टार्गेट करत आहेत. आणि त्यांनी आम्हाला एवढं टार्गेट केलंय की एका. अक्षरशः मरायला भाग पाडले जात आहे.”त्यानंतर आता घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार नसल्याचाही तिने खुलासा केला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

“आजकाल ही सौंदर्याची व्याख्याच झाली आहे”, राजकुमार रावच्या प्लस्टीक सर्जरी बाबत इमरान हाश्मीने केले वक्तव्य
ओपन रिलेशनशिप बाबत जान्हवी कपूरने केला खुलासा, म्हणाली, ‘यावर विश्वास नाही …’

हे देखील वाचा