Monday, July 21, 2025
Home बॉलीवूड ओपन रिलेशनशिप बाबत जान्हवी कपूरने केला खुलासा, म्हणाली, ‘यावर विश्वास नाही …’

ओपन रिलेशनशिप बाबत जान्हवी कपूरने केला खुलासा, म्हणाली, ‘यावर विश्वास नाही …’

जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) आणि शिखर पहारिया यांचे नाते आता कोणापासून लपलेले नाही. दोघांना अनेकदा अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिले गेले आहे. प्रेमाच्या बाबतीत जान्हवी पारंपारिक दृष्टिकोन ठेवते. ओपन रिलेशनशिपवर तिचा अजिबात विश्वास नाही. पण जेव्हा एकाने तिला ओपन रिलेशनशिपबद्दल सल्ला दिला तेव्हा जान्हवीने या सल्ल्याबद्दल काय म्हटले माहिती आहे ?

सध्या जान्हवी तिच्या ‘उलज’ चित्रपटामुळे सतत चर्चेत आहे. जान्हवीचा ‘उलज’ हा चित्रपट २ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. जान्हवीच्या प्रत्येक चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. चित्रपटांमध्ये व्यस्त असूनही जान्हवी रोमान्ससाठी वेळ काढते. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या नुकत्याच झालेल्या लग्न समारंभात जान्हवी आणि शिखर एकत्र दिसले होते. जान्हवी आणि शिखर पहारिया यांच्यातील रोमान्स अनेकदा चर्चेत असतो. जान्हवी आणि शिखर कधीही त्यांचे प्रेम व्यक्त करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. मात्र, दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही. अलीकडेच, जान्हवी कपूरने तिला डेटिंगबद्दल मिळालेल्या सल्ल्याबद्दल एक मनोरंजक खुलासा केला. यासोबतच जान्हवीने तिचे ड्रीम वेडिंग डेस्टिनेशन देखील सांगितले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा जान्हवीला एका मुलाखतीदरम्यान विचारण्यात आले होते की तिला मिळालेला आजपर्यंतचा सर्वात फालतू रिलेशनशिप सल्ला कोणता आहे. त्यावर तिने सांगितले कि, “तुम्ही ओपन रिलेशनशिपचा का प्रयत्न करत नाही?” हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्याला पाहून जान्हवीचे चाहते तिला हा सल्ला कोणी दिला असावा असा अंदाज लावण्याचा प्रयत्न करत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका मुलाखतीदरम्यान जान्हवीला तिच्या ड्रीम वेडिंग डेस्टिनेशनबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने तिरुपती हे तिचे आवडते ड्रीम वेडिंग डेस्टिनेशन असल्याचे सांगितले. जान्हवी अनेकदा तिरुपतीला जाते.

जान्हवी कपूरचे अनेक सिनेमे बॅक टू बॅक रिलीज होत आहेत, त्यामुळे जान्हवीला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहण्याची संधी तिच्या चाहत्यांना मिळत आहे आणि जान्हवीचे चाहते यामुळे खूप खूश आहेत. ‘मिस्टर अँड मिसेस माही’ चित्रपटाच्या अफाट यशानंतर, जान्हवी आता ‘उलज’साठीही खूप प्रशंसा मिळवत आहे. ‘उलज’चा ट्रेलर आणि गाणी रिलीज झाली आहेत. जान्हवीने ‘उलज’मध्ये सुहानाची भूमिका केली आहे, जी लंडन दूतावासात तिच्या महत्त्वाच्या असाइनमेंट दरम्यान एका विश्वासघातकी कटात अडकली जाते.

हा थ्रिलर चित्रपट २ ऑगस्ट २०२४ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. सुधांशू सारिया दिग्दर्शित या चित्रपटात गुलशन देवय्या, रोशन मॅथ्यू, आदिल हुसैन हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय जान्हवी ‘आरसी १६’ मध्ये राम चरणसोबत आणि ‘देवारा’मध्ये ज्युनियर एनटीआरसोबत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

लीक झालेल्या त्या बाथरूम व्हिडीओबाबत उर्वशीने सोडले मौन; म्हणाली, ‘कोणत्याही स्त्रीला असा अनुभव येऊ नये’
बारीक असल्याने बॉलीवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीला नाकारले होते काम… नंतर घडवला इतिहास !

हे देखील वाचा