बीग बॉसच्या पार्टीमध्ये अर्शी खानचा ड्रेस पाहून सलमान हसू आवरेना, म्हणाला, ‘तू तर बिग बॉसचा सोफाच घालून आलीय’


बिग बॉसचा चौदावा सीझन संपून आठ दिवस होत आले तरी अजूनही बिग बॉसच्या बातम्या येतच आहेत. बिग बॉस हा शो जरी त्याच्या वादांमुळे आणि भांडणामुळे प्रसिद्ध असला तरीही, या शोनेच अनेक कलाकारांना नवीन ओळख आणि फॅन फॉलोविंग मिळवून दिली. याच कार्यक्रमातील एक स्पर्धक म्हणजे अर्शी खान. अर्शी खानने बिग बॉसच्या दोन पर्वात सहभाग नोंदवला होता. या दोन्ही पर्वात अर्शीने जबरदस्त लोकप्रियता मिळवली.

सलमान खान देखील बिग बॉसच्या अनेक स्पर्धकांसोबत शो संपल्यानंतरही अनेकदा कार्यक्रमांना आणि पार्ट्यांना सोबत दिसतो. तो या कलाकारांसोबत अनेकदा मजामस्ती करतानाही दिसतो. असाच एक किस्सा अर्शी खानने एका मुलाखतीदरम्यान सांगितला. सलमानने तिला तिच्या ड्रेसवरून चिडवत तिची टांग खेचली होती.

बिग बॉस १४ चा अंतिम सोहळा संपल्यानंतर झालेल्या पार्टीमध्ये अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. याच पार्टीमध्ये अर्शीनेही उपस्थित होती. या पार्टीला आल्यावर सलमान खानाने अर्शीला खूप चिडवले. या पार्टीत अर्शीने घातलेल्या गोल्डन ड्रेसवरून तिला सलमानने खूप चिडवले.

तिच्या ड्रेसवर सलमानने केलेल्या कमेंटवरून तिला खूप हसायला देखील आले. याबद्दल स्वतः अर्शीने खुलासा केला आहे. अर्शीने या पार्टीत लेडी गागाच्या सिल्वर कोट ड्रेसवरून प्रेरित होता. लेडी गागाने हा ड्रेस एमटीवी वीएमएएस २०२० मध्ये घातला होता.

अर्शी खानने मुलाखतीत सांगितले की, ” तो ड्रेसच तसा होता. बिग बॉसचा फिनाले झाल्यानंतर जेव्हा मी शैलेट पार्टीमध्ये घातला होता. मला त्या ड्रेसमधून पाहून सलमान सुद्धा म्हणाला, ” अर्शी, ये क्या पहन के आयी हो? जेव्हा मला माझ्या डिझायनरने हा ड्रेस मला पाठवला तेव्हा मी ठरवले होते हा ड्रेस मी बिग बॉसच्या फिनालेमध्ये घालणार.”

पुढे अर्शी म्हणाली, ” मला या ड्रेसमध्ये पाहून सलमानने एक मस्त कमेंट केली. तो म्हणाला, ” अरे तू बिग बॉसचा सोफाच घालून आली आहेस.” तो असं म्हणाल्यानंतर मला प्रचंड हसायला आले.”

अर्शी खानने लेडी गागाच्या या फ्यूचरिस्टिक ड्रेसला रिसेम्बल करणाऱ्या डाइट सब्याला इंस्टाग्रामवर मॅसेज केला आणि हसत म्हणाली, ” अरे मी तर हेल्मेट घालायला विसरलेच.”

अर्शी खान ही सोशल मीडियावर अनेकदा पोस्ट करते तसेच ती अनेक रियालिटी शोमध्ये सहभाग घेते.

 


Leave A Reply

Your email address will not be published.