अरे व्वा! पवनदीप अन् अरुणिता करणार साखरपुडा?, चाहत्यांसाठी घेऊन आले ‘मोठे’ सरप्राईज

टेलिव्हिजनवरील ‘इंडियन आयडल १२’ हा रियॅलिटी शो चांगलाच गाजला होता. तब्बल १० महिने हा शो चालला होता. या शोमधील स्पर्धकांना देखील प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले होते. या शोचा विजेता पवनदीप राजन आणि रनरअप अरुणिता कांजिलाल यांना देखील प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. त्यांचा हा शो संपल्यानंतर देखील ते दोघे अनेकवेळा भेटत आहेत. शो संपल्यानंतर ते अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट झाले आहेत. अनेक गाण्यांना त्यांनी त्यांचा आवाज दिला आहे. आता पुन्हा एकदा ही जोडी धमाल करण्यासाठी तयार आहे. यावेळी ते त्यांच्या चाहत्यांसाठी एक मोठे सरप्राईज घेऊन आले आहेत.

पवनदीप राजन आणि अरुणिता कांजिलाल यांची जोडी इंडियन आयडल चालू असताना खूप लोकप्रिय होती. त्या दोघांमध्ये नक्कीच कोणते तरी नाते आहे, असे सगळेजण म्हणत होते. परंतु या सगळ्या अफवा आहेत, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या अनेक मुलाखतीत त्यांनी हे स्पष्ट सांगितले आहे की, ते दोघे केवळ चांगले मित्र आहेत. मात्र, त्यांच्या चाहत्यांना असे वाटते की, त्यांची जोडी अशीच असावी. (Arunita kanjilal and pawandeep rajan new song manzoor dil teaser out song release on 23 rd October)

त्यांच्या चाहत्यांची ही इच्छा ते दोघे खऱ्या आयुष्यात तर नाही, परंतु रील लाईफमध्ये पूर्ण करताना दिसणार आहेत. पवनदीप आणि अरुणिता यांचा लवकरच साखरपुडा झालेला दिसणार आहे. त्या दोघांचे एक नवीन गाणे प्रदर्शित होणार आहे. ज्या गाण्यात त्यांच्या आवाजासोबत त्यात अभिनय देखील करणार आहेत. या गाण्याचे बोल ‘मंजूर दिल’ असे आहे. या गाण्याचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

या टिझरमध्ये पवनदीप अरुणिताला त्याच्या मनातील भावना सांगताना दिसत आहे. यामध्ये पवनदीप अरुणिताला म्हणतो की, “एक गोष्ट विचारू का?” यावर अरुणिता म्हणते, “हो विचार.” मग पवनदीप म्हणतो की, “माझी साथ देशील का?” यावर अरुणिता म्हणते की, “हो नेहमीच.” दोघांचे हे रोमँटिक गाणे २३ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या गाण्याबाबत त्या दोघांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या अभिनयाबाबत मत मांडले आहे.

त्यांचा शो चालू असताना या गाण्याचे दिग्दर्शक आणि निर्माते राज सुरानी यांनी या गाण्याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. त्यांनी सांगितले होते की, या गाण्याची शूटिंग अनेक ठिकाणी झाली आहे. या दोघांनी अनेकवेळा एकत्र गाणे गायले आहे, परंतु अभिनय करण्याची दोघांचीही पहिलीच वेळ आहे. त्यांनी सांगितले होते की, त्यांनी पवनदीप आणि अरुणितासोबत एकूण २० गाणी साईन केली आहे. जी लवकरच एका नंतर एक प्रदर्शित केली जाणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आर्यनच्या अटकेवर प्रसिद्ध निर्मात्यांनी व्यक्त केले दु:ख; म्हणाले, ‘बिचारा मुलगा खूप…’

-अमृता राव आणि आरजे अनमोल पहिल्यांदाच शेअर करणार त्यांची ‘विवाह’पर्यंत पोहचलेली अनोखी प्रेमकहाणी

-क्या अंदाज हैं! रोहनप्रीतच्या गळ्यावर चाकू ठेऊन नेहा कक्करने हटके अंदाजात केले प्री एनिवर्सरी सेलिब्रेशन

Latest Post