Thursday, April 18, 2024

शाहरुख अन् आर्यन पहिल्यांदाच पडद्यावर आले एकत्र; चाहते म्हणाले, ‘टॅलेंट जीन्समध्ये…’

बॉलीवूड इंडस्ट्रीतील ‘बादशाह’ शाहरुख खानचा 25 वर्षीय टॅलेंटेड मुलगा आर्यन खान स्वतःचा जीवावर लक्झरी स्ट्रीटवेअर ब्रँड लॉन्च करत आहे. गेल्या दिवशी म्हणजेच साेमवारी (24 एप्रिल)ला या ब्रँडच्या जाहिरातीचा टीझर समोर आला, ज्याला पाहून लोक या संपूर्ण जाहिरातीसाठी खूप उत्सुक झाले. त्याच वेळी, आता संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. क्लिप पाहून हे स्पष्ट होते की, आर्यन खानने याचे दिग्दर्शन तर केले आहेच, पण कॅमेरासमोर आपल्या उत्तम स्टाईलने लोकांना वेड देखील लावले आहे. बाप-लेकाची ही जोडी एकाच फ्रेममध्ये पाहणे चाहत्यांसाठी एखाद्या व्हिज्युअल ट्रीटपेक्षा कमी नाही.

जाहिरात एका ब्लॅकबोर्डने सुरू होते, ज्यावरून असे दिसते की, आर्यन खान (aryan khan) त्याच्या ब्रँडसाठी योजना आखत आहे, परंतु शेवटी तो निराश होतो आणि बोर्डवर लाल चिन्ह टाकून पुढे जातो. यानंतर, आर्यनच्या ब्रँडचा लोगो असलेल्या लाल चिन्हावर क्रॉस चिन्ह देणारा शाहरुख खानची एंट्री हाेते. ब्रँडचे लॉन्चिंग 30 एप्रिल रोजी होणार असल्याचेही क्लिपवरून स्पष्ट झाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @dyavol.x

सोमवारी शाहरुख खानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर या ब्रँडच्या जाहिरातीचा टीझर रिलीज केला आणि 24 तासांत संपूर्ण जाहिरात प्रदर्शित केली जाईल, असा खुलासा केला. अशात जाहिरातीची क्लिप रिलीज झाली असून, त्यात आर्यन खानही पडद्यावर दिसत आहे. हे पाहिल्यानंतर चाहत्यांनी या पोस्टवर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.

या जाहिरातीवर प्रतिक्रिया देताना एका सोशल मीडिया युजरने लिहिले की, “नेपोटिझम किंवा काहीही असो, टॅलेंट जीन्समध्ये असताे.”, तर दुसर्‍याने कमेंट करत लिहिले की, ‘मला माहित नाही की, आर्यनला अभिनेता का व्हायचे नाही. मात्र, तो पडद्यावर छान दिसतो.’ आर्यन खानने त्याला अभिनयात रस नसल्याचे स्पष्ट केले आहे. तो सध्या एक व्यावसायिक आणि चित्रपट निर्माता म्हणून काम करण्याच्या मार्गावर आहे. आर्यन एका वेब सीरिजची स्क्रिप्टही लिहित आहे, ज्याचे दिग्दर्शन तो करणार आहे. याची घाेषणा आर्यनने गेल्या वर्षी केली होती.(aryan khan acting debut with father and bollywood actor shah rukh khan in new ad brand dyavol x took command of direction)

निक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
वयाच्या 16व्या वर्षी अशी दिसत होती ‘शकुंतलम’ अभिनेत्री, फोटो पाहून तुम्ही व्हाल थक्क

शाहरुख खान ‘डंकी’च्या शूटिंगसाठी पोहोचला काश्मीरला, शूटिंगपूर्वी किंग खानचा ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा