अं’मली पदार्थ प्रकरणात सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. आर्यनला आता दर आठवड्याला मुंबई एनसीपीच्या कार्यालयात जाण्याची गरज नाही. केंद्रीय एजन्सीकडून ७२ तासाची नोटीस देण्यात आली आहे, पण दिल्लीतील एमसीबीची पथक जेव्हा आर्यन खानला बोलवेल, तेव्हा त्याला त्यांच्या समोर हजेरी लावावी लागेल, असे देखील न्यायालयाने म्हटले आहे.
आर्यन खानला मिळाला मोठा दिलासा
याव्यतिरिक्त आर्यनला कधीही मुंबईतून बाहेर जायचे असेल, तेव्हा त्याला न्यायालयातील अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल. आता या कोर्टाने दिलेल्या सवलती पाहता आर्यन खानला खूप मोठा दिलासा मिळाला आहे.
तब्बल २० दिवसांच्या तुरुंगवासानंतर आर्यनला २७ ऑक्टोबर रोजी जामीन मिळाला. आर्यनला १४ अटींवर जामीन मिळाला होता. ज्यामध्ये एक एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याचा देखील समावेश होता.
दर शुक्रवारी जावे लागणार नाही न्यायालयात
हे प्रकरण विशेष तपास पथकाकडे प्रलंबित आहे, असे आर्यनने अंतरिम अर्जाद्वारे म्हटले होते. एनसीबी दिल्ली ऑफिसकडे आहे. आता आर्यनला मुंबईतील एनसीबी ऑफिसमध्ये दर शुक्रवारी हजेरी देण्याची गरज नाही. न्यायालयाच्या निर्देशानुसार आर्यनने ५, १२, १९, २६ नोव्हेंबर आणि ३, १० डिसेंबर रोजी एनसीबीच्या मुंबई कार्यालयात हजेरी लावली होती.
आर्यनने आपल्या अर्जात असे देखील सांगितले होते की, दर शुक्रवारी मुंबईतील कार्यालयात हजेरी लावण्यासाठी आल्यावर एनसीबी कार्यालयाच्या बाहेर मीडिया फोटोग्राफरच्या गर्दीमुळे पोलीस अधिकाऱ्यांना त्याच्यासोबत राहावे लागते. याचिकेनुसार मीडियाकडून त्याची सतत चौकशी केली जाते आणि त्याचे फोटो क्लिक केले जातात, हे योग्य नाहीये.
दिनांक २८ ऑक्टोबर रोजी आर्यन, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना प्रत्येकी एक लाख रुपये जातमुचलक्यावर जामीन मिळाला होता.
आर्यन खानला बॉलिवूडकडून होता पाठिंबा
आर्यनच्या अटकेनंतर शाहरुख खान आणि त्याच्या मुलाला सोशल मीडियावर त्यांना खूप नकारात्मक गोष्टींना सामोरे जावे लागले होते. बॉलिवूडमधील काही कलाकारांचा आर्यनला संपूर्ण पाठिंबा होता. प्रत्येकजण सोशल मीडियावर आर्यनच्या समर्थनार्थ पोस्ट आणि ट्वीट लिहायचे. शाहरुख खानने याच्या मुलाला जामीन मिळवून देण्यासाठी खूप संघर्ष केले.
आर्यनला जामीन मिळाल्यानंतर शाहरुख खानने त्याचे स्वागत मन्नत घरामध्ये केले.
हेही वाचा-