प्रसिद्धीचा लोभ नसणाऱ्या उषा मंगेशकर यांना ‘या’ गाण्याने मिळवून दिली ओळख

लोकप्रिय गायिका स्वरकोकीळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची धाकटी बहिण उषा मंगेशकर (Usha Mangeshkar) यांचा आज वाढदिवस आहे. १५ डिसेंबर १९३५ रोजी मध्यप्रदेशात त्यांचा जन्म झाला. मराठी, हिंदी, आसामी, गुजराती, बंगाली अशा अनेक भाषांमध्ये गाणी गायलेल्या उषा मंगेशकर यांनी त्यांच्या भावंडांप्रमाणेच भारतीय चित्रपट संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवला.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर, ज्येष्ठ गायिका आशा भोसले (asha Bhosle) आणि संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर (Hridaynat mangeshkar) यांच्या तुलनेने कमी प्रसिद्ध मिळूनही उषा मंगेशकर यांची कारकीर्द उजळलेली आहे. कोणत्याही प्रसिद्धचा लोभ न करता उषाताई संगीत साधना करीत राहिल्या. आज (१५ डिसेंबर) संगीतकार उषा मंगेशकर त्याचा ८६ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांनी अनेक भाषांमध्ये गाणे गायले आहे त्यांच्या खास वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या विषयी जाणून घेऊया.

View this post on Instagram

A post shared by Usha Mangeshkar (@ushamangeshkar)

उषा मंगेशकर यांनी ‘आम का तारा’ या बॉलिवूड चित्रपटामध्ये ‘मेरी बडी भाभी’ या चित्रपटातून पदार्पण केले. त्यांच्या खास वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात. उषा यांच्या वडिलांचे बालपणीच निधन झाले. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी घरातली मोठी बहीण असणाऱ्या लता मंगेशकर यांनी गाणं गायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर त्यांच्या बहिणीने आशा आणि उषा यांनीही हळूहळू गाणे गाण्यास सुरूवात केली.

View this post on Instagram

A post shared by Usha Mangeshkar (@ushamangeshkar)

उषा ताईनी १९३५ मध्ये पार्श्वगायक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी अनेक कमी बजेटच्या चित्रपटांमध्ये गाणे गायले. पण त्यांच्या या कामाला प्रसिद्धी १९७५ मध्ये आलेल्या ‘जय संतोषी मा’ या चित्रपटाने त्यांना त्यांची ओळख दिली. या चित्रपटात त्यांनी ‘मैं तो आरती उतारू’ हे गाणे गायले होते. या गाण्यानं त्यांना एका रात्रीत स्टार बनवले.

View this post on Instagram

A post shared by Usha Mangeshkar (@ushamangeshkar)

उषा मंगेशकर यांनी ६० वर्षाहून अधिक काळ गाणे गायले. त्यांनी १९९२ मध्ये दूरदर्शनवर ‘फुलावती’ या संगीत नाटकाची निर्मिती केली. ज्याची कथा बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb purandare)यांच्यावर आधारित होती.

हेही वाचा-

पवन सिंग आणि अक्षरा सिंगने बर्फाळ मैदानात आपल्या रोमान्सने लावली आग

एका चापटीने बदलवले होते हिंदी चित्रपटसृष्टीतील राज कपूर यांचे नशीब, कमी वयातच मिळाली ‘शोमॅन’ ओळख

समुद्राच्या पाण्यात चील मारताना दिसली इलियाना डिक्रुझ, मालदीवमधील फोटो आले समोर

Latest Post