अमिताभ बच्चन यांनी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या पोस्टरद्वारे प्रेक्षकांना दाखवली सिनेमाची झलक


अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) यांनी रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्यासोबत त्यांच्या आगामी ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाची (brahmastra) एक झलक प्रेक्षकांना दाखवली आहे. अमिताभ बच्चन सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी चित्रपटाचे मोशन पोस्टर कधी प्रदर्शित होईल याबद्दल सांगितले आहे. अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा हा चित्रपट अयान मुखर्जीने दिग्दर्शित केला आहे. मागील बऱ्याच काळापासून प्रेक्षक या चित्रपटाची वाट पाहत आहे. चित्रपटाची शूटिंग खूप दिवसांपासून सुरू होती. आता प्रेक्षकांची सिनेमाबद्दल असलेली ही उत्सुकता लवकरच संपेल असे वाटत आहे.

अमिताभ बच्चन यांनी ब्रह्मास्त्र चित्रपटाचा पोस्टर केला शेअर

अमिताभ बच्चन यांनी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करताना असे लिहिले आहे की, ‘ब्रह्मास्त्र या चित्रपटाला जगासमोर आणण्याची आमची यात्रा सुरू झाली आहे.” या पोस्टरमध्ये आगीच्या ज्वाळांमध्ये रणबीर कपूर शर्टलेस होत, हात पसरवून वर बघताना दिसत आहे. ही पोस्ट शेअर केल्यानंतर प्रेक्षकांची सिनेमाबद्दल ची उत्सुकता अधिकच वाढली असून, प्रेक्षक त्यांना लवकर ट्रेलर प्रदर्शित करण्याची विनंती कमेंट्समधून करत आहे. मागील बरीच काळापासून चित्रपटाचे शूटिंग चालू आहे. कोरोनामुळे या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखा देखील बऱ्याचदा बदलल्या.

या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची जोडी सोबत दिसणार आहे. याशिवाय या सिनेमात अमिताभ बच्चन, डिंपल कपाडिया, मौनी रॉय (Mouni Roy)आणि नागार्जुन (nagarjun)अक्किनेनी देखील या दिसणार आहेत. या चित्रपटाचे प्रदर्शन २५ डिसेंबर २०२२ रोजी होणार आहे. अयान मुखर्जी आणि रणबीर कपूर यांची जोडी जेव्हा जेव्हा आली तेव्हा धमाका करून गेली. ही जोडी म्हणजे सिनेमा हिट असेच समजले जाते. आता हा सिनेमा किती मोठा धमाका करतो हे पाहण्यासाठी अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे.

हेही वाचा-

मिस युनिव्हर्सला मिळतात अनेक अमूल्य आणि अविश्वसनीय सुविधा, वाचाल तर थक्कच व्हाल

‘आर्या २’ वेब सिरीजचे पोस्टर शेअर करत सलमान खानने केले सुष्मिता सेनचे कौतुक

एका चापटीने बदलवले होते हिंदी चित्रपटसृष्टीतील राज कपूर यांचे नशीब, कमी वयातच मिळाली ‘शोमॅन’ ओळख


Latest Post

error: Content is protected !!