‘लहानपणी मी पाहिलेलं मोठ्ठं स्वप्न…’, ‘लागीर झालं झी’ फेम निखिल चव्हाणने चाहत्यांसोबत शेअर केलं त्याचं बालपणीचं स्वप्न


‘लागीर झालं झी’ मधील कलाकारांनी आपल्या अभिनयाने लाखो मने जिंकली. मालिकेला संपून बराच काळ लोटला असला, तरीही यातील सर्व पात्रं प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालून आहे. असेच एक पात्र आहे ‘विक्रम राऊत’, जे अभिनेता निखिल चव्हाणने साकारलं होतं. यातील निखिलच्या अभिनयाने अनेकांना प्रभावित करून सोडलं. पण तुम्हाला माहिती आहे का? की अल्पावधीतच एवढे नाव कमावलेल्या या अभिनेत्याला लहानपणापासूनच अभिनेता व्हायचं होतं. होय, याबद्दल स्वतः निखिलने सांगितले आहे.

अभिनेता सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. या ठिकाणी तो त्याच्या व्यावसायिक आयुष्यापासून ते वैयक्तिक आयुष्यातील सर्व गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतो. नुकतीच त्याने शेअर केलेली एक पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याने त्याच्या लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यात अभिनेता खूपच गोंडस दिसत आहे. अंगात पांढरा सदरा आणि गमछा घालून निखिलने ओठांच्यावर मिशीदेखील काढलेली पाहायला मिळत आहे. त्याच्या या लूकवरून असे लक्षात येते की, त्याने हा लूक एखाद्या नाटकासाठी केला आहे.

इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर करत, निखिलने कॅप्शनमध्ये त्याच्या बालपणीचे स्वप्नही चाहत्यांना सांगितले आहे. कॅप्शनमध्ये निखिल म्हणतोय की, “लहानपणी मी पाहिलेलं मोठ्ठं स्वप्न होतं ऍक्टर बनायचं.” यावरून तुम्हाला सहज लक्षात येईल की, निखिलला लहानपणीपासूनच अभिनयाप्रती ओढ आहे. चाहते देखील या फोटोवर मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत आहेत.

निखिल चव्हाणच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने ‘लागीर झालं झी’ मध्ये सहाय्यक भूमिका साकारत टीव्ही जगात पाऊल ठेवले होते. यातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले, शिवाय त्याला सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्याचा ‘झी मराठी अवॉर्ड’ देखील मिळाला. आता अभिनेता ‘कारभारी लयभरी’ या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकत आहे.

‘ऍट्रॉसिटी’ चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर प्रवेश केल्या नंतर निखिल ‘गर्ल्स’, ‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ आणि ‘डार्लिंग’ या चित्रपटात झळकला. याशिवाय त्याने ओटीटीवरही पदार्पण केले आहे. निखिल ‘वीरगती’ आणि ‘स्त्रीलिंग पुल्लिंग’ या वेबसिरीजमध्ये दिसला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कियारा आडवाणीचा बिकिनीतील व्हिडिओ घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ, करतेय ‘या’ गोष्टीला मिस

-आहा कडकच ना! ‘लुट गए’ गाण्यावर पोरीचा जबरदस्त डान्स, मिळाले १ कोटीपेक्षाही अधिक व्ह्यूज

-नादच खुळा! यूट्यूबर शिरुश्रीने केला धमाकेदार ‘शिव तांडव’ डान्स; पाहून तुमचेही थिरकतील पाय


Leave A Reply

Your email address will not be published.