सामान्य माणसाला सेलिब्रिटी करण्याची ताकद ही आजच्या सोशल मीडियामध्ये आहे. अनेक माणसं या सोशल मीडियाचा वापर त्यांची कला जगासमोर आणण्यासाठी देखील करत असतात. जे व्हिडिओ किंवा ज्या कला खरंच चांगल्या असतात त्या नक्कीच व्हायरल होतात आणि त्या कलाकाराला सेलिब्रिटी बनवतात. याच सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अगदी कॉमेडीपासून, डान्स आणि रेसिपीसह अनेक विषयांवर इथे व्हिडिओ उपलब्ध असून यांना पाहणाऱ्यांची संख्याही कोटींच्या घरात आहे.
सध्या सोशल मीडियावर एक डान्स व्हिडिओ खूपच गाजताना दिसत आहे. यूट्यूबर शिरुश्री सैकिया या मुलीचा एक डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. खरं तर हा व्हिडिओ तिने तिच्या यूट्यूब अकाऊंटवरून शेअर केला आहे. तिचा डान्स पाहून व्हिडिओ पाहणारे सर्वच तिचे कौतुक करताना थकत नाहीयेत. हा डान्सचा प्रकार साधासुधा नसून ‘तांडव’ आहे. शिरूश्रीने शिव तांडव स्तोत्रावर डान्स केला असून, हा व्हिडिओ आता लोकप्रिय झाला आहे.
शिरूश्रीने या डान्समध्ये तिच्या स्टेप्स आणि एक्सप्रेशनने जास्त वाहवा मिळवली आहे. हा डान्स व्हिडिओ एकलव्य डान्स ऍकॅडमीने सादर केला असून, याची कॉन्सेप्ट आणि कोरियोग्राफी दोन्ही शिरूश्री सैकियानेच केली आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत १७ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.
शिरूश्री सैकिया हिच्या तांडव या डान्स व्हिडिओवर चाहत्यांच्या भरपूर प्रतिक्रिया येत आहेत. एका फॅनने लिहिले आहे की, ‘मी पहिल्यांदा कोणाला इतक्या ऊर्जासह डान्स करताना पाहत आहे. तांडव हा महत्त्वाचा नृत्यप्रकार आहे. मात्र, तो इतर नृत्यप्रकारांच्या तुलनेत फार प्रसिद्ध नाही.”
या व्हिडिओला ५५ हजारांपेक्षाही अधिक लाईक्स आणि १ हजारापेक्षाही अधिक कमेंट्स आल्या आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-आहा कडकच ना! ‘लुट गए’ गाण्यावर पोरीचा जबरदस्त डान्स, मिळाले १ कोटीपेक्षाही अधिक व्ह्यूज