कियारा आडवाणीचा बिकिनीतील व्हिडिओ घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ, करतेय ‘या’ गोष्टीला मिस

Kiara Adawani share her throw back video on social media


बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी ही सोशल मीडियावर जोरदार सक्रिय असते. वेगवेगळे फोटो शेअर करून चाहत्यांना घायाळ करण्याची एकही संधी ती सोडत नाही. कियाराचा समावेश बॉलिवूडमधील अत्यंत बोल्ड आणि हॉट अभिनेत्रींमध्ये होतो. तिची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. त्यामुळे कोणताही फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही. अशातच कियाराचा एक थ्रोबॅक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.

कियाराने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून बिकिनीमधील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती खूप बोल्ड आणि हॉट दिसत आहे. यामध्ये ती सेल्फी व्हिडिओ शूट करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून असे वाटते की, हा व्हिडिओ मालदीवमधील आहे. परंतु पोस्टमध्ये तिने त्या जागेचा उल्लेख केला नाहीये.

हा व्हिडिओ शेअर करून तिने कॅप्शन‌ दिले आहे की, “सनशाईन आणि टॅनला मी खूप मिस करत आहे.” तिचा हा व्हिडिओ नेहमी प्रमाणेच तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. सगळेजण या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. तसेच तिचा बोल्डनेस पाहून तिचे चाहते पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडले आहेत.

कियारा आडवाणीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती एका नंतर एक अनेक चित्रपटात दिसणार आहे. ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘शेरशाह’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षापर्यंत प्रदर्शित होणार आहे. तसेच ती कार्तिक आर्यनसोबत ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटात देखील दिसणार आहे. ती ‘जुग जुग जियो’ मध्ये देखील दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आहा कडकच ना! ‘लुट गए’ गाण्यावर पोरीचा जबरदस्त डान्स, मिळाले १ कोटीपेक्षाही अधिक व्ह्यूज

-नादच खुळा! यूट्यूबर शिरुश्रीने केला धमाकेदार ‘शिव तांडव’ डान्स; पाहून तुमचेही थिरकतील पाय

-उर्वशी रौतेलाकडून मोठी चूक; तब्बल ७२ तासांपासून वाट पाहणाऱ्या चाहत्यांची अभिनेत्रीने हात जोडून मागितली माफी


Leave A Reply

Your email address will not be published.