ज्येष्ठ गायिका आशाजींच्या मुलीने ‘या’ गोष्टीला कंटाळून नऊ वर्षांपूर्वी केली आत्महत्या; पुर्वीही केला होता स्वता:ला मारण्याचा प्रयत्न


आपल्याला सामान्य लोकांना बॉलिवूड आणि या जगात वावरणाऱ्या लोकांबद्दल खूप आकर्षण असते. नाव, पैसा, प्रसिद्धी, ग्लॅमर आदी सर्व स्वप्नवत वाटणाऱ्या गोष्टी या क्षेत्रात मिळत असल्याने साहजिकच अनेक लोकं या इंडस्ट्रीकडे ओढले जातात. मात्र वरून चकाचक दिसणाऱ्या या जगात जेव्हा तुम्ही पाऊल ठेवता, तेव्हा तुमच्या लक्षात येते की, हे वरवर दिसणारे यश किती पोकळ आहे. मीडियासमोर छानछान कपड्यांमध्ये, मेकअप करून आनंदचा आव आणून बोलणाऱ्या कलाकरांना देखील अनेक दुःख, टेन्शन असतात.

सिनेसृष्टीतील लोकप्रिय आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि त्यांच्या आभाळाएवढ्या उपलब्धीबद्दल सर्वानाच माहित आहे. सतत चेहऱ्यावर हास्य ठेवणाऱ्या आशा भोसलेंच्या चेहऱ्यामागे देखील एक मोठे दुःख लपलेले आहे. १००० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये, २० पेक्षा अधिक भाषांमध्ये १२००० पेक्षा जास्त गाणे गाणाऱ्या आशा भोसले म्हणजे संगीत क्षेत्रातील लोकांसाठी दैवतच आहे. वयाच्या १० वर्षांपासून आशाजी यांनी त्यांच्या गायनाच्या करियरला सुरुवात केली. अनेक मोठे आणि अशक्य रेकॉर्ड बनवणाऱ्या आशाजी या पहिल्या भारतीय गायिका आहेत, ज्यांना ग्रॅमी पुरस्कारांमध्ये नामांकन मिळाले आहे. १९९७ आणि २००५ मध्ये आशाजींना या मानाच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्करांसाठी नामांकन मिळाले आहे. व्यायसायिकदृष्ट्या यशाच्या शिखरावर असलेल्या आशाजींनी मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खूप मोठ्या दुःखाचा सामना केला आहे.

आशा भोंसले यांच्या मुलीने वर्षाने २०१२ साली स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली होती. ही घटना आशाजी घरात नसताना घडली. २०१२ साली आशाजी सिंगापूरमध्ये एका पुरस्कार सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी घरात कोणी नसताना त्यांची मुलगी वर्षा यांनी स्वतः ला गोळी झाडली आणि आत्महत्या केली. वर्षा या एक पत्रकार होत्या. त्या हिंदी आणि मराठी वृत्तपत्रांसाठी लेखन करायच्या. सोबतच वर्षा उत्तम गायिका देखील होत्या. त्यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.

आशा ताईंसोबत अनेकदा वर्षा विविध कॉन्सर्टमध्ये हजेरी लावायच्या. मात्र वर्षा अनेक दिवसांपासून डिप्रेशनच्या शिकार झाल्या होत्या. वर्षा यांनी ज्या पिस्तुलने स्वतः वर गोळी झाडली, ती पिस्तूल त्यांच्या भावाची होती. आत्महत्या झाल्यानंतर वर्षा यांच्या शवाजवळ कोणतीही सुसाईड नोट सापडली नव्हती. मात्र काही काळापासून त्या नैराश्याने ग्रस्त होत्या आणि याआधी देखील त्यांनी आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न केला होता.

सप्टेंबर २००८ साली जेव्हा वर्षा यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, तेव्हा त्यांना मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्या त्यांच्या वजन वाढीच्या समस्येमुळे त्रस्त होत्या. सोबतच नैराश्य आणि इतर काही आजार देखील त्यांना होते. वर्षा यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांनी स्पोर्ट्स रायटर असणाऱ्या हेमंत केंकरेसोबत लग्न केले होते, मात्र दुर्दैवाने १९९८ साली त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्या आशा ताईंसोबतच राहत होत्या.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दिव्यांका त्रिपाठीला आली होती ‘दया बेन’च्या रोलसाठी ऑफर? खरं काय ते घ्या जाणून

-‘मला जबरदस्तीने प्रेग्नंट करू नका, होईल तेव्हा पेढे वाटेल’, प्रेग्नंसीच्या वृत्तांवर पूनम पांडेने सोडले मौन

-‘किंग खान’च्या लाडकीने केला जिममधील मिरर सेल्फी शेअर; दिसतेय एकदम ‘फिट एँड फाईन!’


Leave A Reply

Your email address will not be published.