दिव्यांका त्रिपाठीला आली होती ‘दया बेन’च्या रोलसाठी ऑफर? खरं काय ते घ्या जाणून


टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी या दिवसात रियॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी’च्या शूटिंगमध्ये खूप व्यस्त आहे. या शोची शूटिंग दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे होत आहे. दिव्यांका ही टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. या आधी तिने ‘मोहब्बतें’ या मालिकेत काम केले आहे. अशातच तिच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे. (Television actress divyanka Tripathi ever offered dayaben role in Taarak Mehta ka ooltah chashma)

माध्यमातील वृत्तानुसार, टेलिव्हिजनवरील सर्वात जास्त चर्चेत असणारी मालिका ‘तारक मेहता का उलटा चष्मा’मध्ये दया बेनच्या पात्रासाठी दिव्यांकाला ऑफर आली होती. परंतु तिने हा रोल करण्यासाठी नकार दर्शवला होता. परंतु स्वतः दिव्यांकाने यावर कोणतेही भाष्य केले नाही. आता या बातमीत किती सत्यता आहे, हे आपल्याला दिव्यांकाच सांगू शकते.

या मालिकेतील दया बेनचे पात्र निभावणारी अभिनेत्री दिशा वकानी या मालिकेत पुन्हा येणार आहे की, नाही याबाबत सध्या खूप चर्चा चालू आहे. दिशाने 2017 मध्ये मॅटर्निटी लिव्ह घेऊन या मालिकेमधून ब्रेक घेतला होता. त्यानंतर ती अजूनही या मालिकेत परत आलेली नाही. ‘हे मा माताजी’ आणि ‘टप्पू के पापा’ यांसारखे डायलॉग बोलून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या दिशा वकानीला सगळे प्रेक्षक खूप मिस करत आहेत.

दुसरीकडे दिव्यांका केपटाऊनमध्ये खूप मस्ती करत आहे. ती दररोज सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी नवनवीन फोटो शेअर करत असते. नुकतेच ‘खतरों के खिलाडी 11’चा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोमध्ये दिव्यांका त्रिपाठी मगरीला घेऊन बसलेली दिसत आहे. एवढंच नाही, तर ती त्या मगरीला झोपवण्यासाठी अंगाई देखील गाताना दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मला जबरदस्तीने प्रेग्नंट करू नका, होईल तेव्हा पेढे वाटेल’, प्रेग्नंसीच्या वृत्तांवर पूनम पांडेने सोडले मौन

-‘किंग खान’च्या लाडकीने केला जिममधील मिरर सेल्फी शेअर; दिसतेय एकदम ‘फिट एँड फाईन!’

-रशियाच्या रस्त्यांवर साडी नेसून फिरतेय तापसी पन्नू; सोशल मीडियावर रंगलीये चांगलीच चर्चा


Leave A Reply

Your email address will not be published.