Friday, September 20, 2024
Home बॉलीवूड आशा भोसलेंना ‘दम मारो दम’ गाण्याची रॉयल्टी देण्याची मागणी; ऍपल इव्हेंटमध्ये फेमस झाले होते गाणे

आशा भोसलेंना ‘दम मारो दम’ गाण्याची रॉयल्टी देण्याची मागणी; ऍपल इव्हेंटमध्ये फेमस झाले होते गाणे

सन १1971 मध्ये प्रदर्शित झालेला ‘हरे रामा हरे कृष्णा’ हा प्रसिद्ध हिंदी चित्रपट कदाचित सर्वांच्याच परिचयाचा असेल. या चित्रपटातील सर्वच गाणी गाजली होती. यातीलच एक म्हणजे ‘दम मारो दम’ होय. हे गाणे अनुभवी अभिनेत्री झीनत अमान आणि सुपरस्टार देव आनंद यांच्यावर चित्रीत केले होते. आता याच गाण्यामुळे झीनत अमान चर्चेत आल्या आहेत. कारण, नुकतेच जगप्रसिद्ध ऍपल कंपनीने आपल्या आयफोन 13लाँच केला होता. ऍपल इव्हेंटमध्ये ‘दम मारो दम’ या गाण्याचे संगीत वाजवण्यात आले होते. त्यानंतर हे गाणे सर्वत्र चर्चेत आहे. नेटकऱ्यांसोबतच कलाकारही यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

बॉलिवूडमध्ये खूपच जुना आहे रॉयल्टीचा मुद्दा
नुकतेच आयफोन १३ लाँचिंगवेळी ‘दम मारो दम’ गाणे वाजवल्याच्या वृत्तावर झीनत अमान यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी म्हटले होते की, “आनंद आहे की, १९७१ चे म्युझिक ४० वर्षांनंतर आजही ऐकले आणि पसंत केले जात आहे.” त्यांनी हे गाणे पहिल्यांदा जेव्हा ऐकले होते, तेव्हा त्यांनाही आवडले होते. मात्र, त्यांना अपेक्षा नव्हती की, हे इतके प्रसिद्ध होईल. (Asha Bhosle Dum Maro Dum Song Came Into The Limelight After Apple Event Now Demand For Royalty)

आशा भोसलेंना रॉयल्टी देण्याची मागणी
अशातच याबाबत म्युझिक कंपोजर राजेश रोशन यांनी आपले मत मांडले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आज जरी पंचम (आर.डी. बर्मन) या जगात नाहीत. मात्र, आशा जी आहेत. या गाण्यासाठी त्यांना सन्मान मिळाला पाहिजे. पंचम यांनी अनेक शानदार गाणी चाहत्यांना दिली आहेत. मात्र, त्यांना न्याय मिळाला नाही.

रॉयल्टीबाबत होतात चर्चा
मात्र, आता जेव्हा हे गाणे इतके सुपरहिट झाले आहे, तर प्रत्येक जण म्युझिक कंपोजर आणि गायकाला या गाण्यासाठी खरी प्रसिद्धी मिळाल्याचे सांगत आहे. अशातच सोशल मीडियावर चाहते या गाण्यासाठीच नाही, तर अनेक गाण्यांसाठी रॉयल्टीची मागणी करत आहेत. सन 2017 मध्येही अनेक म्युझिक कंपन्यांवर आयटीने धाड टाकली होती, ज्यामध्ये स्पष्ट झाले होते की, कशाप्रकारे रॉयल्टीचे उल्लंघन केले जात आहे.

नुकतेच कॅलिफोर्निया स्ट्रिमिंग लाँच इव्हेंटमध्ये आयफोन 13 लाईनअपमध्ये चार नवीन मॉडेल्स लाँच केले आहेत. याठिकाणी ‘दम मारो दम’ या गाण्याने देशवासियांचे लक्ष वेधून घेतले होते. या गाण्याचे संगीत या इव्हेंटमध्ये वाजवण्यात आले होते.

हेही नक्की वाचा-
सोनालीच्या सौंदर्याची जादू आजही तशीच! नवे फोटो पाहून चाहते बेभान
‘भारतातल्या प्रेक्षकांनो…’, सकर्षण कऱ्हाडेने प्रेक्षकांना केली विनंती, नेटकरी म्हणाले, ‘दादा तुम्ही…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा