Friday, July 12, 2024

बॉयफ्रेंड ऋत्विकसोबत ब्रेकअपनंतर ‘अशी’ झाली होती आशाची हालत; म्हणाली, ‘चालता चालता टोमणे मिळायचे…’

टीव्ही कलाकार असोत किंवा बॉलिवूड कलाकार, चाहते त्यांच्या आवडत्या स्टारच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, विशेषतः त्यांच्या नात्याबद्दल जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. आता असेच काहीसे आशा नेगी (Asha Negi) आणि ऋत्विक धनजानीसोबत (Rithvik Dhanjani) पाहायला मिळाले आहे, जे एकेकाळी सर्वात प्रेमळ जोडपे होते. ब्रेकअपच्या वृत्तावर अभिनेत्री याआधीही मोकळेपणाने बोलली असली तरी, यावेळी पुन्हा तिने तिची व्यथा मांडली आहे.

https://www.instagram.com/p/CZ6C1u1vJqa/?utm_source=ig_web_copy_link

ऋत्विक धनजानी आणि आशा नेगी यांची जोडी चाहत्यांना खूप पसंत होती, यात काही शंका नाही. पण त्यांच्या ब्रेकअपच्या बातमीने चाहत्यांची मने तर सोडाच, पण खुद्द अभिनेत्रीसाही खूप तुटली आहे. आशा नेगीने सांगितले की, लोक तिला कसे दोष देतात आणि म्हणतात की, आता तिने चित्रपटात काम करायला सुरुवात केली आहे, मग त्याला कुठे डेट करणार. अभिनेत्री म्हणाली, असे बरेच लोक होते, जे म्हणत होते की “हा चित्रपट मिळाला आहे, त्यामुळे त्यांचे ब्रेकअप झाले आहे. आता चित्रपटात अभिनेत्री झाली आहे, तर आता ती त्याला डेट का करेल? लोक काहीही विचार न करता असे जज करतात. ते स्वत: अशा गोष्टींचा विचार करतो, जे खूप वाईट आहे. जे काही घडलं ते माझ्या आणि त्याच्यात होतं. आमच्यामध्ये प्रेम आणि आदर आहे.” (asha negi on breakup with rithvik dhanjani says people blame and judge her)

आशा आणि ऋत्विक यांची भेट ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. दोघे २०१३ पासून रिलेशनशिपमध्ये होते. बराच काळ एकत्र राहिल्यानंतर २०२० मध्ये दोघे वेगळे झाले. आशा नेगीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तिने टीव्हीशिवाय वेब सीरिजमध्येही काम केले आहे. ‘बारिश’ शोमधून तिने वेब सीरिजच्या दुनियेत प्रवेश केला. आता येत्या ८ एप्रिलला ती ‘अभय ३’ मध्ये दिसणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत कुणाल खेमू मुख्य भूमिकेत असणार आहे.

हेही वाचा

हे देखील वाचा