Wednesday, July 3, 2024

आथिया अन् राहुल यांच्या लग्न सोहळ्यत पाहुण्यांसोमोर ठेवल्या ‘या’ अटी, वाचून तुम्हालाही बसेल धक्का

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आणि उद्योगपती सुनील शेट्टी याची लाडकी लेक आथिया शेट्टी आणि भारतीय विकेट किपर के एल राहुल यांच्या लग्नाच्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होत्या. शेवटी उद्या सोमवार (दि, 23 जानेवारी) रोजी हे जोडपं लग्न बंधनात अडकणार आहे. कालपासूनच म्हणजेच (दि, 21 जानेवारी) पासूनच यांच्या मेहंदी, हळदी आणि लग्नापूर्वीचे कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. सुनिल शेट्टी याच्या खंडाळामधील बंगल्यावर थाटामाटात हा लग्न सोहळा पार पडणार आहे. अशातच या जोडप्याने लग्नाबद्दल एक मोठी निर्णय घेतला आहे.

सतत चर्चेत असणारं प्रसिद्ध कपल आथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि भारतीय क्रिकेट संंघामधील विकेट किपर के एल राहुल (KL Rahul) हे गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. आता (दि, 23 जानेवारी) रोजी हे जोडपं लग्न बंधनात अडकणार असून त्यांच्या मेहंदी आणि हळदी कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. हा लग्नसोहळा मोजक्याच पाहुण्यांमध्ये म्हणजेच जवळचे नातेवाइक आणि मित्रपरिवार असे 100 मोजक्याच पाहुण्यांना आमंत्रण दिलं जाणार आहे असं सांगण्यात आलं. मात्र, अता यामध्ये अजून एक महत्वाचा नियम पाहुण्यांना पाळावा लागणार आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा, विकी कौशल आणि कॅट्रीना कैफ यासारखंच यांच्या लग्नामध्ये देखिल मोजकीच पाहुणे मंडळी लग्नासाठी उपस्थित राहणार आहेत. यांनी देखिल त्यांच्या लग्नामध्ये पाहुण्यांसाठी एक शर्यत ठेवली आहे. ज्याचे पालन करणे अनिवार्य आहे. राहुल आणि आथिया यांच्या लगनामध्ये येणाऱ्या पाहुण्यांना मोबाईल वापरण्यावर बंदी घातली आहे.

 

View this post on Instagram

 

त्याप्रमाने आलेल्या पाहुणे मंडळीचे फोन लग्नाच्या ठिकाणी पोहोचण्या आधीच काढून घेतले जाणार आहेत. पाहुणे मंडळींना लग्नांचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करण्यावर बंदी घातली आहे. असं बोललं जात आहे की या निर्णयावर राहुल आणि आथिया शेट्टी यांच्या कुटुंबियांनी या गोष्टींवर काहीच प्रतिक्रिय दिली नाही. लग्नसोहळ्यामध्ये बॉलिवूडमधील कलाकारांसह क्रिकेर्सही सहभागी होणार आहेत. सध्या सोशल मीडियावर आथिया आणि राहुल यांच्या लग्नाच्या बातम्यांनी धुमाकूळ घातला आहे. सर्वत्र याच्या लग्नाच चर्चा पाहायला मिळत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हॅपी संडे! श्रेया घोषालच्या हटके पाेज पाहिलात का?
मायलेकीने केले ट्विनिंग! एकदा पाहाच फाेटाे गॅलरी

 

हे देखील वाचा