Saturday, June 29, 2024

आथिया शेट्टीने केएल राहुलला दिले मोठे सरप्राईज! लग्नाआधीच…

‘हिरो’ या चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री आथिया शेट्टी ही तिच्या रिलेशनशिपमुळे नेहमी चर्चेत असते. हिरो हा चित्रपट फार काही चालला नाही, त्याच्या नंतर साथिया बॉलिवूडमध्ये फार काही काम करताना दिसली नाही पण ती मात्र, सोशल मीडियावर खूप सर्किय असते. तिने ठामपणे आपले नाते जगासमोर व्यक्त केले आहे, तर काही अभिनेत्री असे करण्यासाठी घाबरत असतात. तिने सोशल मीडियाद्वारे तिचे आणि केएल राहुलसोबतचे फोटो शेयर केले आहेत आणि चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

आथिया शेट्टी आणि केएल राहुल लग्नाआधीच

सुनिल शेट्टीची( Sunil Shetty ) मुलगी आथिया शेट्टी (Athiya Shetty ) हिने सोशल मीडियाद्वारे आपल्या प्रेमाची कबूली दिली. पण ही गोष्ट कीतीही लपवली तरी लपून रहत नसते साथिया आणि  भारतीय क्रिकेट टिमचा नामांकित खेळाडू केएल राहुल हे दोघे काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. हे दोघं बॉलिवूडच्या क्युट कप्पल पैकी एक आहेत,  त्यांच्यातील नात्यामुळे ते दोघे नेहमी चर्चेत असतात. चाहते तर त्यांच्या लग्नाची वाट पाहत होते आणि तिथेच आथिया शेट्टाने शेयर केलेल्या फोटोने तर वेगळीच बातमी दिली आहे.

जिथे सेलिब्रिटी आपल्या रिलेशन बद्दल बोलण्यासाठी घाबरतात तिथेच आथिया आणि केएल राहुल ( KL Rahul ) हे बिंदास्त पणे आपले नाते उघडकीस आणत आहेत. दोघांच्या लग्ना बद्दलच्या चर्चा नेहमीच येत असतात पण माध्यमानुसार असे कळले आहे की, आथिया आणि राहुल हे लिव-इन रिलेशनशिप मध्ये राहत आहेत.

या नविन जोडप्याला मुंबइ बांद्रामध्ये एक घर दिले आहे आणि या घरामध्ये लिव्हइनमध्ये एकत्र राहत आहेत. आणि सध्या राहुल जिम्बाब्वे विरुद्धच्या क्रिकेट दौऱ्यामध्ये व्यस्त असल्याचे समोर आले आहे. राहुलला सरप्राइज देण्यासाठी आथिया एक आठवड्यामध्येच घरामध्ये राहायला आली आहे आणि के एल राहुल येण्याच्या आधी घराला सजवत आहे.

वडिलांनी केली घराची पुजा –

तुम्हाला हे बघून आश्चर्य वाटेल की, आथियाचे वडिल अभिनेता सुनिल शेट्टी आणि माना शेट्टी यांनी जुलै महिण्यामध्ये या घराची पुजा केली होती. आणि आता आथिया आणि केएल हे तिथे राहणार आहेत या दोघांचे प्रेमगाठ एवढी घट्ट आहे की, हे कधीही एकमेकांवर प्रेम  व्यक्त करण्याची संधी सोडत नाहीत. आणि आता प्रत्येकालाच यांच्या लग्नाची आतुरता आहे.

हेही वाचा –
मुहूर्त ठरला! ‘पुष्पा २’ बद्दल रश्मिकाने दिली महत्वाची अपडेट, पोस्ट व्हायरल
वयाने १२ वर्षे लहान अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती सोनाली फोगाट
आलिया भट्ट लग्नाआधी रणबीर कपूरसोबत एकाच खोलीत का राहू लागली, ‘हे’ कारण आले समोर

 

 

 

हे देखील वाचा