Friday, December 8, 2023

Atisha naik | अतिशा नाईक यांनी सांगितला पहिल्या मासिक पाळीचा अनुभव, म्हणाल्या; ‘मी आधी बाबांना सांगितलं’

Atisha naik | आजकाल मराठी चित्रपटसृष्टीतील असे अनेक कलाकार आहे जे सगळ्यांसमोर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करताना आपल्याला दिसतात. असाच एक अनुभव अभिनेत्री अतिषा नाईक यांनी सांगितला आहे. एखादी मुलगी वयात आल्यावर तिच्या शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात आणि यातील सगळ्यात मोठा टप्पा म्हणजे एका विशिष्ट वयात देणारी मासिक पाळी. या काळात प्रत्येक मुलीला तिच्या सगळ्याच जवळची व्यक्ती जवळ असणं खूप गरजेचं असतं आणि अतिशय नाईक यांनी त्यांच्या आयुष्यातील याच घटनेबद्दल काही गोष्टी शेअर केले आहेत.

अभिनेत्री अतिषा नाईक (atisha naik) मागील अनेक वर्षापासून मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये देखील कार्यरत आहेत आत्तापर्यंत त्यांनी अनेक भूमिका साकारले आहेत तसेच त्यांच्या भूमिका देखील घराघरात पोहोचले आहेत आणि सगळ्यांना त्या आवडतात देखील आहेत. त्यांनी अनेक वेळा त्यांची परखडपणे असणारी मते देखील मांडलेली आहेत.

आता देखील अतिषा नाईक त्यांनी त्यांच्या आयुष्यातील मासिक पाळी बद्दलची घटना सांगितला आहे. अतिशय नाही म्हणाल्या की मी सगळ्या गोष्टींसाठी माझ्या बाबांवर पूर्ण होणे अवलंबून होते अगदी कोणतीही गोष्ट सांगायची असेल तर मी सगळ्यात आधी जाऊन माझ्या बाबांना सांगायची कारण त्यांनी मला नेहमी समजून घेतलं आणि मला कधीच केले नाही.”

Atisha naik
Photo Courtesy: Instagram/atishanaik

पुढे त्या म्हणाल्या की जेव्हा माझी पहिली मासिक पाळी आली तेव्हा त्याबद्दल मी सगळ्यात आधी माझ्या बाबांना सांगितले मी खूप घाबरले होते मला समजत नव्हतं की आता काय करावे मला कळेना की नेमकं काय झालं आहे आणि यावर मी काय करायचे आहे. यानंतर ही गोष्ट मी बाबांना सांगितली कारण त्यांच्यासोबतच माझं खूप घट्ट नातं होतं.

यानंतर त्या म्हणाल्या की माझ्यासोबत जे काही घडत आहे त्याला मासिक पाळी किंवा पिरियड्स असे म्हणतात याबद्दल देखील मला कोणी माहिती दिली नव्हती कारण त्यावेळी आम्हाला शाळेत देखील शिक्षण दिले जात नव्हतं परंतु आता या सगळ्या गोष्टींची माहिती मुलींना आधीच दिली जाते ही खूप चांगली गोष्ट आहे.

पुढे त्या म्हणाल्या की, “मी ही सगळी गोष्ट बाबांना सांगितली आणि त्यावेळी ते म्हणाले हे असंच होत असतं पण याबद्दल मी तुला जास्त काही सांगू शकणार नाही तुला तुझी आई नीट सगळं समजावून सांगेल. परंतु माझे बाबा माझ्यासाठी इतके जवळचे होते की मी ही गोष्ट सगळ्यात आधी आई ऐवजी बाबांना सांगितली आणि त्यानंतर आमचे नाते आणखीनच घट्ट झाले.”

अशाप्रकारे अतिषा नाईक यांनी त्यांच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची गोष्ट आणि घटना त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केली. अतिशय नाईक यांनी अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करून घराघरात प्रसिद्धी मिळवली आहे. त्यांच्या मालिका देखील प्रेक्षकांना खूप आवडतात. अतिशय नाईक यांनी सुंदर मनामध्ये भरली, सुख म्हणजे नक्की काय असतं, घाडगे अँड सून यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-
kangana ranaut chandramukhi |’चंद्रमुखी 2′ मध्ये कंगना रणौतचा अनोखा अंदाज, पाच फ्लॉप चित्रपटानंतर सावरणार करिअरची नौका
Amisha patel on bollywood | ‘गदर 2’ च्या सक्सेसनंतर अमिषा पटेलने केली बॉलीवूडची पोलखोल म्हणाली, ‘मला टारगेट केले होते’

हे देखील वाचा