×

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला ईडीचा दणका! तब्बल ‘इतक्या’ कोटीची मालमत्ता जप्त

काही महिन्यांपूर्वी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस  (jacqueline fernandez)कॉनमॅन सुकेश चंद्रशेखरला डेट करत असल्याने चांगलीच चर्चेत आली होती. २०० कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेला सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलीनचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामुळेच जॅकलीन इडीच्या रडावर आली होती. आता इडीने जॅकलीनवर या प्रकरणात मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली असून जॅकलीनची ७. २७ कोटींची मालमत्ता इडीने जप्त केली आहे. सुकेश चंद्रशेखरने जॅकलीनला ५.७१ कोटींची महागड्या भेटवस्तू दिल्याचा अंदाजही इडीने व्यक्त  केला आहे त्यामुळे जॅकलीनच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. सध्या या बातमीची बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि सुकेश चंद्रशेखर यांच्यात जवळचे संबंध असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी चांगलीच रंगली होती. सुकेशने जॅकलीनला कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तूही दिल्या होत्या. यामध्ये सोन्याचे दागिने, हिरे आणि लाखो रुपयांचा घोडाही त्याने दिला होता. त्यांचे एकत्रित असतानाचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळेच इडीने जॅकलीनवर ही कारवाई केली आहे. याबाबत इडीने जॅकलीनवर सुकेशने तब्बल १० कोटी रुपये उधळल्याचाही अंदाज व्यक्त केला आहे.

सुकेश चंद्रशेखर हा मनी लॉड्रिंग प्रकरणात अटकेत आहे. यासाठी जॅकलीन मुख्य साक्षीदार असल्याचे इडीने म्हटले आहे.  बंगळूरचा रहिवासी असलेल्या सुकेशने ऐशारामी आयुष्य जगण्यासाठी लोकांना फसवण्याचा धंदा आरंभला होता. त्याच्यावर फसवणुकीचे तीस पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. मात्र आता या प्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसवर इडीने कारवाई केल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे. जॅकलीन फर्नांडिसही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने सिने जगतातील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

अर्शी खानने दुबईत केला साखरपुडा? अभिनेत्रीने सांगितले व्हायरल बातमीमागील सत्य

पुण्यतिथी | करोडोंची संपत्ती असलेल्या अचला सचदेव यांची अखेरच्या क्षणी होती अशी अवस्था, रुग्णालयातच गेला होता जीव

हिंदी भाषेच्या वादावर कंगना रणौतने केले मोठे वक्तव्य, म्हणाली ‘तमिळ ही हिंदीपेक्षा जुनी भाषा आहे पण…’

Latest Post