Tuesday, May 28, 2024

अवधूत गुप्तेने केला त्याच्या पहिल्या प्रेमाचा खुलासा; म्हणाला, ‘चौथी ‘अ’मध्ये असताना मी तिला…’

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार दिग्दर्शक गायक अवधूत गुप्ते (Avdhoot gupte)हा त्याच्या दमदार आवाजामुळे आणि गाण्यांमध्ये नेहमी चर्चेत असतो. त्याने मराठी सिनेसृष्टीला अनेक भन्नाट गाणी दिलेली आहेत. त्याचप्रमाणे अवधूत गुप्ते हा त्याच्या हटके स्टाईल आणि बिंदास स्वभावामुळे देखील सगळ्यांना खूप आवडतो. नुकतेच त्याने माध्यमांना मुलाखत दिली त्या मुलाखतीत त्याने त्याच्या पहिल्या प्रेमाबद्दल सांगितले. त्याचप्रमाणे त्याने पहिल्यांदा प्रपोज कधी केले होते याचा देखील त्यांनी खुलासा केला आहे.

या मुलाखतीमध्ये त्याला “पहिल्यांदा तू कोणाला प्रपोज केलं आणि कधी केला?” असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी मी शाळेत असताना पहिलं प्रपोज केलं होतं असा खुलासा केला.

यावेळी तो म्हणाला की, ‘मी शाळेत असताना पहिलं प्रपोज केलं होतं. एक इयत्ता चौथी तुकडी अ मध्ये असताना मी केलं होतं. असं म्हणत अवधूतनी त्याच्या प्रेमाचा किस्सा सांगितला त्यासोबत सेलिब्रिटी क्रश कोण आहे हे देखील त्यांनी सांगितलं.

अवधूत गुप्ते हा काजोलचा खूप मोठा फॅन आहे. त्याला काजोलचे चित्रपट देखील खूप आवडते. काही दिवसांपूर्वी अवधूत गुप्ते ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी घेऊन आला होता. यावेळी हा कार्यक्रम देखील त्यानेच होस्ट केला होता. तसेच तो लवकरच ‘सुर नवा ध्यास नवा’ या शोमध्ये देखील दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘तेजस’ चित्रपटाचा टीझर रिलीज, भारतीय वायुसेनेची पायलट म्हणून कंगना रणौतच्या लूकची होतीये वाहवा
हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबाने व्यक्त केले दुःख; म्हणाली, ‘माझ्या वैयक्तिक आयुष्यामुळे लोक माझ्यावर टीका करतात’

हे देखील वाचा