Saturday, June 29, 2024

‘लोक आपला वेळ विसरतात…’, म्हणत यशपाल यांनी नवाजुद्दीन सिद्दीकीवर व्यक्त केला संताप

हिंदी चित्रपटामधील प्रसिद्ध अभिनेता यशपाल शर्मा यांनी अनेक चित्रपाटमध्ये खलनायकाच्या भुमिकेने प्रेक्षकांवर भुरळ घातली आहे. त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिकांचे आजही कौतुक केले जाते. सध्या अभिनेता त्यांचा नवीन चित्रपट ‘दादा लखमी’ मुळे खूपच चर्चेत आले आहे. या चित्रपाटाने हरियाना शिवाय दुसऱ्या राज्यांमध्येही चांगले प्रदर्शन केले आहे. ज्यांनी ज्यांनी हा चित्रपट पाहिला आहे तो यशपाल यांचे,कौतुक केल्यशिवय राहिला नाही.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता यशपाल शर्मा (Yashpal Sharma) सध्या त्यांचा नवीन चित्रपट ‘दादा लखमी’ (Dada Lakhami) मुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या दमदार अभिनयाचे भरभरुन कौतुकही केले जात आहे. अभिनेत्याने दोनवर्षापूर्वी इंटरनॅशनल फिल्मफेस्टिवलची सुरुवात केली होती. मात्र, त्यावेळेस कोरना माहामारी आसल्यामुळे फेस्टिव्हलचे प्रदर्शन 2020 आणि 2021 साली ऑनलाईन केले गेले. त्यामुळे यावर्षी हे फिल्म फेस्टिवल (दि, 17 डिसेंबर) आणि ( दि, 18 जिसेंबर) रोजी मुंबईमध्ये होणार आहे. या कार्यक्रमाचा निमंत्रण सोहळा मंगळवार (दि, 13 डिसेंबर) रोजी ठेवला होता. या कार्यक्रमाच्या यादीमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) याचे देखिल नाव होते. मात्र, अभिनेत्याने त्यांना दगा दिला.

बॉलिवूड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या आयोजनाबद्दल सांगत असताना यशपाल यांनी सांगितले की, “फिल्म फेस्टिवलचा मुख्य उद्देशच आहे की, चांगल्या चित्रपटांचे प्रमोशन करणे. या फेस्टिवलमध्ये देशविदेशातील चांगल्या चित्रपटांची निवड केली आहे. आमचा हेतू देशविदेशामधील स्तरीय चित्रपटांना लोकांसमोर आणने आहे. चित्रपट कोणत्याही प्रकरचा असो मग तो कमी बजेटचा असो किंवा फोनने शुट केलेला असो कोणत्याही प्रकारचा चित्रपट आम्ही सगळ्यांचाच स्वागत केला आहे. गेल्यावर्षीप्रमाने यार्षाही डॉक्युमेंट्री चित्रपट, मोबाइल चित्रपट, वेब सिरिज, म्युजिक व्हिडिओ शिवाय अनेक प्रकाराने बनवलेल्या टित्रपटांपैकी सर्वोत्कृष्ट निवडलेल्या चित्रपटाला पुरस्कार दिला जाईल.

यशपाल यांनी पुढे सांगितले की, “आतापर्यंत झालेले दोन्ही फेस्टिवल अप्रतिम पार पडले. यामध्ये आमच्यात खुपच सुपर एनर्जी जोडलेली होती. या सत्राचे वैशिष्ट्य म्हणजे आंतरराष्ट्रीय बंधुता आणि सौहार्दाला प्रोत्साहन देण्यासाठी इराण आणि अफगाणिस्तानमधील चित्रपटांसाठी विनामूल्य प्रवेश ठेवण्यात आला होता. या फेस्टिव्हलमध्ये जेवढे चित्रपट समाविष्ट झाले आहेत, ते पाहता जवळपास सर्वच चित्रपट हे सामाजिक विषयांवर आधारित आहेत.”

मुंबई फिल्म फेस्टिवलेचे आयोजन 17 डिसेंबर आणि 18 डिसेंबर रोजी कार्निवल सिनेमागृहामध्ये होणार आहे. त्यामध्येच यशपाल यांचा नवीन चित्रपट ‘दादा लखमी’ चे खास स्क्रिनिंग होणार आहे. त्याबद्दल बोलत असताना यशपाल यांनी सांगितले की, “आशुतोष गोवारीकर आणि संगीतकार उत्तम सिंग खास उपस्थित राहणार आहेत. यशपाल शर्माच्या हरियाणवी चित्रपट ‘दादा लख्मी’ने आतापर्यंत 68 हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत.”

बॉलिवूड फिल्म फेस्टिवलमधील प्रेस कॉन्फरन्ससाठी मुख्य पाहुणे म्हणून नवाजुद्दीन सिद्दीकी याला आमंत्रित केले होते. खूप वेळ त्याची वाट पाहिली मात्र, अभिनेता आला नाही. यावर प्रश्न विचारल्यानंतर यशपाल यांनी खूुप दु:खी मनाने सांगितल की, “नवाजुद्दीन सिद्दीकीने येण्याचे आश्वासन दिले होते आणि शेवटच्या क्षणी त्याचा संदेश मिळाला की, तो कार्यक्रमात येऊ शकत नाही. नवाजने मला आधी सांगितले असते, तर मी आशुतोष राणा (Ashitosh Rana) किंवा राजपाल यादव (Rajpal Yadav) यांना फोन केला असता. पण काय सांगू, लोक आपला वेळ विसरतात.”

यशपाल यांनी नवाजुद्दीन सिद्दीकी याची वाट पाहिली आणि अभिनेत्याने त्यांचे मन तोडले त्यामुळे यसपाल दु:खी झाल्याचे दिसून आले मात्र, अभिनेत्याच्या वक्तव्यानंतर नवाजुद्दीन काय प्रतिउत्तर देतिल हे पाहाणे फारच महत्वाते ठरेल.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘खाटाखाली चप्पल शोधत आहेस का..?’ ‘बेशरम रंग’ गाण्यावर चोरीचा आरोप तर ट्रोलर्सने दीपिकाची घेतली शाळा

‘गोपी बहू’अडकणार लग्नबंधनात? सोशल मीडियावर हळदी समारंभाच्या फोटोचा कहर…

हे देखील वाचा