Sunday, May 19, 2024

शॉकिंग! राजपाल यादवने विद्यार्थ्याला दिली धडक, अभिनेत्याविरुद्ध तक्रार दाखल

बॉलिवूडमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. ही बातमी बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव याच्याशी संबंधित आहे. राजपाल सध्या उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे आगामी सिनेमाची शूटिंग करत आहे. यादरम्यान त्याच्यासोबत एक घटना घडली, ज्यामुळे तो चर्चेत आहे. एका मुलाने राजपालवर हाणामारी आणि गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. खरं तर, राजपाल प्रयागराजच्या कटरा भागात एका हिंदी सिनेमाची शूटिंग करत होता. यादरम्यान तो स्कूटर चालवत होता. यावेळी स्कूटर खराब झाल्यामुळे त्याने बालाजी नावाच्या एका विद्यार्थ्याला धडक दिली आणि त्याला दुखापतही झाली. या धडकेत विद्यार्थी कथितरीत्या जखमी झाला आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्याने कर्नलगंज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

असा आरोप आहे की, त्या विद्यार्थ्याने आक्षेप घेतल्यानंतर राजपाल यादव (Rajpal Yadav) याच्या बाऊंसरने त्याला मारहाण केली. यानंतर विद्यार्थ्याने कर्नलगंज पोलीस ठाण्यात राजपाल आणि त्याच्या क्रू मेंबर्सविरोधात लिखित तक्रार दाखल केली. दुसरीकडे, राजपालनेही विद्यार्थ्यासह अनेकांवर शूटिंग रोखण्याचा आरोप लावला आहे. सिनेमाच्या प्रोडक्शन मॅनेजरनेही गुन्हा दाखल करण्यासाठी कथित पीडित विद्यार्थ्याविरुद्ध तक्रार नोंदवली आहे.

त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले की, जिल्हा प्रशासनाच्या परवानगीने सुरू असलेल्या शूटिंगमध्ये काही विद्यार्थी आणि लोकांनी अडथळा निर्माण केला. विद्यार्थ्यावर शूटिंगमध्ये अडथळा आणल्याबद्दल आणि कलाकारांना त्रास देण्याचा आरोप लावला आहे. पोलिसांनी अद्याप तक्रारीवर एफआयआर दाखल केली नाहीये.

राजपाल यादवच्या स्कूटरचा क्लच तुटला
कर्नलगंज पोलीस ठाण्यातील एसएचओ राम मोहन राय यांनी म्हटले की, राजपाल जी स्कूटर चालवत होता, ती स्कूटर जुनी होती. एसएचओने पुढे सांगितले की, स्कूटर चालवताना क्लचची तार तुटल्यानंतर राजपालचे नियंत्रण सुटले आणि विद्यार्थ्याला धडक दिली. पोलिसांनी म्हटले की, विद्यार्थ्याला कुठलीही दुखापत झाली नाही. मात्र, पुढील तपास सुरू आहे, त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
आनंदाची बातमी! 51 वर्षांच्या वयात तिसऱ्यांदा बाप बनला ‘हा’ अभिनेता, फोटो शेअर करत दिली माहिती
उर्फी पुन्हा चर्चेत! कारण ठरलं पोलीस तक्रार; राग व्यक्त करत म्हणाली, ‘माझ्यावर लैंगिक…’

हे देखील वाचा