बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी चाहत्यांना हिट चित्रपट दिले आणि नंतर अचानक त्यांनी इंडस्ट्रीला राम राम ठोकला. या यादीत आयशा टाकियाच्या (Ayesha Takia) नावाचाही समावेश आहे. आयशा टाकियाने ‘वॉन्टेड’, ‘दिल मांगे मोर’, ‘शादी नंबर-१’, ‘शादी से पहले’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे, पण लग्नानंतर आयशाने फिल्मी जगापासून अंतर ठेवले. आयशाने नेता अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमीसोबत लग्न केले असून, आज आयशा आणि फरहान आझमीच्या लग्नाला १३ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त आम्ही तुम्हाला आयशा टाकियाच्या लग्नाशी संबंधित काही गोष्टी सांगणार आहोत.
२००८ मध्ये केले लग्न
आयशा टाकियाने वयाच्या २३व्या वर्षी फरहान आझमीशी लग्न केले. २००९ मध्ये दोघांचे लग्न झाले, पण लग्नापूर्वी दोघांनीही त्यांच्या डेटिंग लाईफचा खूप आनंद लुटला. आयशाचा पती फरहान हा बिझनेसमॅन असून, मुंबईत त्याचे एक हॉटेल देखील आहे. आयशा अनेकदा फरहानच्या हॉटेलमध्ये जात असे. मात्र, तेव्हा त्यांच्या नात्याबाबत कोणतीही माहिती समोर आली नव्हती. पण २००५ नंतर दोघेही सार्वजनिकपणे दिसायला लागले. दोघांनी तीन वर्षे त्यांच्या प्रेम जीवनाचा आनंद लुटला आणि नंतर त्यांनी त्यांच्या नात्याला एक पाऊल पुढे नेण्याचा निर्णय घेतला. (ayesha takia and farhan azmi celebrates 13th wedding anniversary see couple wedding photos)
लग्नानंतर बदलला धर्म
फरहान आझमीसोबत लग्न केल्यानंतर आयशा टाकियाने धर्म बदलला. यानंतर अभिनेत्रीने तिच्या नावासमोर आझमी लावायला सुरुवात केली. आज आयशा आणि फरहान एका मुलाचे आई-वडील आहेत आणि त्यांच्या आयुष्यात आनंदी आहेत. एका मुलाखतीत आयशा टाकियाने तिच्या पतीचे कौतुक करताना सांगितले की, “तो खूप प्रामाणिक आणि मेहनती आहे. एक चांगला मित्र आणि सर्वांत चांगला नवरा कसा असावा, हे त्याला माहीत आहे.”
आयशाची कारकिर्द
आयशाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. यानंतर तिने म्युझिक अल्बमही केले. हळूहळू तिला चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. आयशा टाकियाचा पहिला चित्रपट २००४ मध्ये आलेला ‘टार्झन: द वंडर कार’ होता. यासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. २००६ मध्ये तिचा ‘डोर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, ज्यासाठी तिला झी सिनेचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. सलमान खानसोबतचा ‘वॉन्टेड’ हा आयशाचा सर्वात यशस्वी चित्रपट होता.
सर्जरीमुळे झाली ट्रोल
आयशा टाकियाचा लूक आता खूप बदलला आहे. २००० सालापासून आत्तापर्यंत ती खूप बदलली आहे. अभिनेत्रीने ओठ, जॉ लाइन, भुवया आणि कपाळावर शस्त्रक्रिया केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, चाहत्यांना तिचा हा नवा लूक फारसा आवडला नाही, त्यामुळे त्याला खूप ट्रोल व्हावे लागले.
हेही वाचा –