×

अभिनेता आयुष शर्माचे आजोबा सुखराम शर्मा यांचे निधन, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती

बॉलिवूड अभिनेता आणि सलमान खानचा जीजा असलेल्या आयुष शर्माच्या आजोबांचे पंडित सुखराम शर्मा यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. सुखराम शर्मा हे माही केंद्रीय मंत्री देखील होते. एका माहितीनुसार ब्रेन स्ट्रोकमुळे त्यांचे निधन झाले. आयुषने स्वतः सोशल मीडियावरून याबद्दल माहिती दिली आहे. आयुषने एक भावनिक पोस्ट शेअर करत ही बातमी लोकांपर्यंत पोचवली आहे. दरम्यान ९५ वर्षीय माजी मंत्री असलेल्या सुखराम शर्मा यांची तब्येत मागच्या आठवड्यापासून खालावली. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना मनालीमधून एयरलिफ्ट करून दिल्लीला आणण्याचे ठरवले होते, मात्र त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.

ayush-sharma-grandfather-pandit-sukhram-sharma-passed-away

यासर्व दिवसांमध्ये आयुष शर्मा सतत त्याच्या आजोबांच्या तब्येतीची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना देत होता. मधल्या काही दिवसांमध्ये पंडित सुखराम यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या मीडियामध्ये आल्यानंतर आयुषने त्याच्या एका पोस्टमध्ये त्याने लिहिले होते की, “माझे आजोबा पंडित सुखराम अतिशय हिमतवान असून, आणि धीराने ते सर्व गोष्टींशी लढत आहे. मात्र या कठीण काळात मी सर्वांना विनंती करतो की, त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करा आणि खोट्या बातम्या, अफवा पसरवू नका. आम्ही वेळोवेळी त्यांच्या तब्येतीबद्दल तुम्हाला माहित देत राहू. तुमच्या प्रार्थनांसाठी खूप धन्यवाद.”

सलमान खानची लहान भिन्न असलेल्या अर्पिता खानने आयुष शर्मासोबत २०१४ साली लग्न केले. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आयुष शर्माच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर त्याने ‘लव्हयात्री’ सिनेमातून त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. शेवटचं तो महेश मांजेरकर यांच्या ‘अंतिम’ सिनेमात सलमान खानसोबत दिसला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post