Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘आम्ही खूप कॅलरीज बर्न करतो’ म्हणत, आयुष्मान खुरानाच्या पत्नीने शेअर केले बेडरुम सिक्रेट

मराठी सिने जगतातील अभिनेते आणि अभिनेत्री त्यांच्या बिंनधास्त वक्तव्यासाठी नेहमीच प्रसिद्ध असतात. माध्यमांशी बोलताना किंवा सोशल मीडियावर अनेकदा या कलाकारांची बिंनधास्त वक्तव्ये पाहायला मिळतात. सध्या प्रसिद्ध अभिनेता आयुष्मान खुरानाच्या (Ayushman Khurana)  पत्नीने केलेल्या अशाच एका वक्तव्याची चर्चा सिने जगतात रंगली आहे. आयुषमानची पत्नी ताहिरा कश्यपने शिल्पा शेट्टीच्या कार्यक्रमात सेक्सबद्दल बोलताना त्यांचे बेडरुम सिक्रेट शेअर केले आहेत. काय म्हणाली ती नेमकी चला जाणून घेऊ. 

प्रसिद्ध अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप एक लेखिका आहे. अलिकडेच तिने शिल्पा शेट्टीच्या शेफ ऑफ यू कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिने या कार्यक्रमात अनेक विषयांवर आपले मत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमात शिल्पा शेट्टीने तिला तिच्या पुस्तकांंमध्ये सेक्स शब्द वापरताना कसे वाटते असा प्रश्न विचारला होता. यावर ताहिराने न डगमगता उत्तर दिले. कॅलरी बर्न करण्यासाठी सेक्स हा सर्वोत्तम व्यायाम असल्याचे तिने सांगितले. ती एवढ्यावरच थांबली नाही तर आमच्या बाबतीत खूप कॅलरीज खर्च होतात. असे म्हणत थेट त्यांच्या सेक्स लाईफबद्दलच खुलासा केला. ताहिराने कर्करोगादरम्यान केस कापल्याचा अनुभवही शेअर केला.

केस कापल्यानंतर चेहरा आरशात पाहिला तेव्हा तो स्वतःला खूपच सेक्सी वाटला. तसेच तिला सोनाली बेंद्रेकडून खूप प्रेरणा मिळाली असे तिने सांगितले.  सोनाली बेंद्रेही कॅन्सरने त्रस्त होती आणि उपचार करून अमेरिकेतून परतल्यावर तिनेही केस कापले. मात्र 6 महिन्यांनंतर ताहिरालाही कर्करोग झाला. असेही तिने यावेळी सांगितले. दरम्यान, आयुष्मान खुराना अनेकांमध्ये दिसणार आहे. आयुष्मान खुरानाबद्दल सांगायचे तर, ‘विकी डोनर’, ‘दम लगा के हैशन’, ‘बधाई हो’, ‘अंधाधुन’, ‘आर्टिकल 15’ या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्यानंतर आता आयुष्मान खुराना अनेक चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये त्याची भूमिका आहे. याशिवाय ‘डॉक्टर जी’ हा देखील त्याच्या आगामी चित्रपटांपैकी एक आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा