‘विकी डोनर’ हा चित्रपट २० एप्रिल २०१२ रोजी प्रदर्शित झाला होता. १० वर्षांपूर्वी अशाच एका निषिद्ध विषयावर चित्रपट बनवण्यात आला होता, ज्याबद्दल लोक उघडपणे बोलायचेही नाहीत. शूजित सरकार तसेच आयुष्मान खुराना आणि यामी गौतम सारख्या कलाकारांनी हा चित्रपट बनवून धोका पत्करला. आज या चित्रपटाला १० वर्षे पूर्ण होत असताना दिग्दर्शक-निर्मात्याने स्पर्म डोनेशनसारख्या विषयावर चित्रपट बनवण्याची जोखीम पत्करून प्रेक्षकांची मनेही जिंकल्याचे बोलले जात आहे.
रोमान्स, अॅक्शन आणि कॉमेडीने भरलेले चित्रपट हे यशाचे मोजमाप मानले जातात, परंतु काहीवेळा गंभीर विषय हलक्याफुलक्या पद्धतीने सादर करून चित्रपट निर्माते मनोरंजनासोबतच संदेशही देतात. १० वर्षांपूर्वीही असेच काहीसे घडले होते. निषिद्ध विषयांवर चित्रपट बनवण्याचा धोका असला तरी सुमारे १५ कोटी रुपये खर्चून बनलेल्या ‘विकी डोनर’ने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला. बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम देखील या चित्रपटाचा सहनिर्माता होता. अन्नू कपूर यांनी डॉ. बलदेव म्हणून अप्रतिम काम केले.
शुजित सरकारनं जवळपास ७ वर्षांनी पुनरागमन केलं आहे. २००५ साली शुजीतने रोमँटिक वॉर ड्रामा फिल्म ‘यहाँ’ बनवली आणि जवळजवळ गायब झाला. २०१२ मध्ये त्याने ‘विकी डोनर’मधून पुनरागमन केले. या चित्रपटाच्या यशाने शुजित बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांपैकी एक बनला.
आयुष्मान खुराना या चित्रपटापूर्वी आरजे, रिअॅलिटी शो होस्ट करत होता. त्याने त्याच्या पहिल्याच चित्रपटात आउट ऑफ द बॉक्स भूमिका करण्याची जोखीम घेतली, पण ही जोखीम यशस्वी ठरली आणि अभिनेता म्हणून आयुष्मानची ओळख बनली. त्याचवेळी यामी गौतमनेही विक्की डोनरसोबत हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, याआधी यामीने काही साऊथ चित्रपटांमध्ये काम केले होते. पहिला चित्रपट आणि तोही अशा ऑफबीट विषयावर, नवीन कलाकारांसाठी जोखमीचा होता पण आयुष्मान आणि यामीच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकली.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
- रवी शास्त्री यांच्यासोबत होता होता राहिले अमृता सिंगचे लग्न, अचानक समोर ठेवली भलतीच अट
- गोविंदा आणि धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या ‘मखना’ डान्सची परदेशात हवा, व्हिडिओ होतोय व्हायरल
- चेहऱ्याची ट्रीटमेंट करताना संतोष जुवेकरने केला व्हिडिओ शेअर, ‘या’ खास व्यक्तीचे मानले आभार