Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

क्या बात है! Tamannaah Bhatia लग्नासाठी म्हणाली हो? चाहत्यांची उत्सुकता शिगेला

बॉलिवूडमधून मोठी बातमी समोर येत आहे. ‘बाहुबली‘ फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया ही लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची बातमी आहे. बॉलिवूडची ‘ब्युटी क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी तमन्नाच्या लग्नाची चर्चा सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, तमन्ना लवकरच मुंबईच्या एका व्यावसायिकासोबत लग्नबंधनात अडकू शकते. खरंच असं होणार आहे का? चला जाणून घेऊया…

तमन्ना अडकणार लग्नबंधनात?
माध्यमांतील वृत्तांनुसार, 32 वर्षीय तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) ही नवरी बनण्यासाठी सज्ज झाली आहे. यासाठीची सर्व तयारी तिने पूर्ण केली आहे. ती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे ती कोणताही नवीन प्रोजेक्ट साईन करत नाहीये. कारण, ती लवकरच लग्नाच्या तयारीमध्ये व्यस्त होणार आहे. त्यामुळे तिला स्वत:साठी थोडा वेळही हवा आहे.

वृत्तांमध्ये असा दावाही करण्यात आला आहे की, तमन्नाने व्यावसायिकाने लग्नासाठी घातलेली मागणी स्वीकारली आहे. तसेच, तिने लग्नासाठीही होकार कळवला आहे. तरीही, अभिनेत्रीने तिच्या लग्नाविषयीच्या बातम्यांवर अद्याप शिक्कामोर्तब केले नाहीये, पण तिने यासाठी नकारही दिलेला नाहीये. असेही म्हटले जात आहे की, तमन्ना लवकरच तिच्या लग्नाविषयी अधिकृत घोषणा करू शकते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks)

तमन्ना बॉलिवूडच्या सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये गणली जाते. तिने अनेक हिंदी सिनेमांमध्ये शानदार काम केले आहे. बॉलिवूडव्यतिरिक्त साऊथ सिनेसृष्टीतही अभिनेत्रीचे मोठे प्रस्थ आहे. तिने तिच्या कारकीर्दीत अनेक हिट सिनेमे दिले आहेत, ज्यामध्ये ‘बाहुबली’ या सिनेमाचाही समावेश आहे.

यापूर्वीही रंगल्या होत्या तमन्नाच्या लग्नाच्या चर्चा
लग्नाबद्दल बोलताना तमन्नाने काही काळापूर्वी म्हटले होते की, लोक लग्नाला खूप महत्त्व देतात. ती म्हणाली होती की, जेव्हा योग्य वेळ येईल, तेव्हा ती लग्न करेल. तमन्नाच्या लग्नाविषयी चर्चा होण्याची ही पहिली वेळ नाहीये, यापूर्वीही तिच्या लग्नाच्या अफवा उडाल्या होत्या. मात्र, त्या आधारहीन होत्या. आता यावेळीही तमन्नाच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. अशात अभिनेत्री लग्नबंधनात अडकते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अरेरे! रँप वॉकसाठी सजून आलेली पाकिस्तानी अभिनेत्री; पण पुढे जे झालं, त्यामुळे देशात उडवली गेली थट्टा
‘हीच का आपली संस्कृती’, ऐश्वर्याने मुलीच्या ओठांवर किस करताच भडकले नेटकरी, सोशल मीडियावर एकच खळबळ

हे देखील वाचा