Sunday, May 19, 2024

दु:खद! ‘बाहूबली’फेम अभिनेत्याला पितृशोक! 95व्या वर्षी वडिलांनी घेतला जगाचा निरोप

साउथचे प्रसिद्ध अभिनेते नासर यांचे वडील महबूब बाशा यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 95 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मेहबूब बाशा हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांनी चंगेलपेट येथील त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला.

वडिलांच्या निधनाने अभिनेता नासर (actor Nasser father passed away) आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. साउथ इंडस्ट्रीतील कलाकरांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. बुधवाराी (11 ऑक्टोबर) मेहबूब बाशा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नासर हे साऊथ सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे, त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या नासर हे अ‍ॅक्टर्स युनियनचे अध्यक्ष आहेत.

माध्यमातील वृत्तानुसार, मेहबूब बाशा यांना सुरुवातीपासूनच मुलगा नासरला अभिनेता बनवायचे होता, ज्यासाठी त्यांनी आयुष्यात खूप संघर्ष केला. नासर यांचे वडील मेहबूब बाशा हे पूर्वी ज्वेलरी पॉलिशिंगचे काम करायचे. कष्टाने कमावलेल्या पैशाने त्यांनी नासरला अभिनय शाळेत प्रवेश मिळवून दिला. नासर यांनीही वडिलांची इच्छा पूर्ण करत फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ साऊथ इंडियन फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स आणि तमिळनाडू इन्स्टिट्यूट फॉर फिल्म अँड टेलिव्हिजन टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतला आणि अभिनयाचे प्रशिक्षण घेतले.

मात्र घरची परिस्थीती बिकट असल्याने त्यांनी अभिनयातुन ब्रेक घेत चेन्नईतील एका हॉटेलमध्येही काम केले. आता नासर ते साउथमधील प्रसिद्ध अभिनेते बनले आहे. नासर यांच्या वडीलांच्या निधनाची बातमी कळताच, चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

अभिनेते नासर हे साऊथ सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. नासर यांच्या करिअरची सुरुवात 1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या तमिळ चित्रपट “मूंदरम पिराई” पासून झाली. या चित्रपटात त्यांनी छोटी भूमिका केली होती. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका केल्या. त्यांनी “बाहूबली” या चित्रपटात देखील काम केले आहे. (Baahubali fame actor Nassar father passed away)

आधिक वाचा-
ताेबा ताेबा! शर्वरी वाघ स्विमिंग पूलकिनारी झाली जास्तच बाेल्ड; बिकिनीतील फाेटाे व्हायरल
चाहत्यांसाठी खुशखबर! शहनाज गिलला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, पोस्ट शेअर करत दिले हेल्थ अपडेट्स

हे देखील वाचा