Friday, December 1, 2023

चाहत्यांसाठी खुशखबर! शहनाज गिलला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, पोस्ट शेअर करत दिले हेल्थ अपडेट्स

काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल झालेल्या अभिनेत्री शहनाज गिलला डिस्चार्ज देण्यात आला. शहनाज गिलच्या रुग्णालयात दाखल होण्याची बातमी समोर आल्यापासून तिच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती. मात्र, आता तिच्या डिस्चार्जची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शहनाज गिलला (Shahnaz Gill)मंगळवारी (10 ऑक्टोबर) रोजी मुंबईतील खाजगी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. शहनाज गिलच्या डिस्चार्जनंतर तिच्या चाहत्यांनी तिला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. शहनाज गिलला गेल्या काही दिवसांपासून तब्येत बरी नसल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शहनाज गिलच्या रुग्णालयात दाखल होण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला व्हिटॅमिन्सची कमतरता आणि थकवा जाणवत होता.

शहनाज गिल आता घरी विश्रांती घेत असून लवकरच तिला पुन्हा कामावर परतण्याची अपेक्षा आहे. शहनाज गिलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे . या व्हिडिओमध्ये, अभिनेत्रीला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याचे दिसत आहे आणि ती स्कार्फने चेहरा लपवून रात्री उशिरा कारमधून घराकडे निघताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शहनाजचे चाहते खूप आनंदित झाले आहेत आणि आता ते तिच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोकांनी त्याला स्वतःची काळजी घेण्यास सांगितले, तर काहींनी त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ” कृपया शहनाजची काळजी घे”. दुसर्‍याने लिहिले की, “तुझी तब्येत लवकर बरी व्हावी, अशी माझी इच्छा आहे.” तिच्या या व्हिडिओवर अनेक कमेंट येत आहेत. अभिनेत्री शहनाज गिलला पोटाच्या संसर्गामुळे कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अशा परिस्थितीत शहनाजने स्वतः इंस्टाग्रामवर लाईव्ह येऊन तिच्या तब्येतीची माहिती दिली. आता तो पूर्णपणे बरी असल्याचे तिने सांगितले. (Shahnaz Gill discharged from hospital)

आधिक वाचा-
‘ऍनिमल’ चित्रपटातील पहिले ‘हुआ है’ गाणे रिलीझ, रणबीर आणि रश्मिकाच्या लीपलॉक सिनने वेधले लक्ष
ताेबा ताेबा! शर्वरी वाघ स्विमिंग पूलकिनारी झाली जास्तच बाेल्ड; बिकिनीतील फाेटाे व्हायरल

हे देखील वाचा