‘बाहुबली: द बिगनिंग’ सिनेमाला सहा वर्ष पूर्ण, कलाकारांनी फोटो शेअर करत दिला आठवणींना उजाळा


तब्बल १०० पेक्षा अधिक वर्ष पूर्ण झालेल्या भारतीय सिनेसृष्टीने आजपर्यंत अनेक अविस्मरणीय, दर्जेदार सिनेमे प्रेक्षकांना दिले. या १०० वर्षांमध्ये प्रत्येक काळानुसार चित्रपटांमध्ये बदल होत गेले. प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन सिनेमे तयार झाले. मात्र, ते म्हणतात ना, काही सिनेमे किंवा काही कलाकृती अनेक वर्षांनी एकदा बनतात. मग त्यात ‘मुघल-ए- आझम’पासून ते ‘जोधा अकबर’पर्यंत अनेक मोठ्या सिनेमांचा समावेश आहे. काही सिनेमांनी फक्त हिट हा टॅग न मिळवता प्रेक्षकांच्या डोक्यात आणि मनात कायमस्वरूपी आपली जागा तयार केली. असाच एक सिनेमा म्हणजे ‘बाहुबली.’ या सिनेमाने संपूर्ण जगाला एक मोठा प्रश्न दिला होता आणि तो म्हणजे ‘कटप्पाने बाहुबली को क्यों मारा?’ याच सिनेमाने नुकतेच सहा वर्ष पूर्ण केले आहेत.

भारतीय सिनेसृष्टीतील मोठा, भव्य आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या चित्रपटांपैकी एक सिनेमा म्हणजे ‘बाहुबली: द बिगनिंग.’ बाहुबली सिनेमाने फिल्मइंडस्ट्रीचे सर्वच रेकॉर्ड तोडले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच बोलण्यात बाहुबली हे नाव आजही येते. इतकी मोठी आणि खोल छाप या सिनेमाने प्रेक्षकांवर सोडली. आज या चित्रपटाला सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. जवळपास ३,६०० कोटींपेक्षा अधिक रुपयांची कमाई केलेल्या या सिनेमाने हिट या शब्दाची जणू व्याख्याच बदलली. या सिनेमाने संपूर्ण कलाकारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली.

सहा वर्ष पूर्ण झाल्यामुळे या सिनेमातील कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर आठवणींना उजाळा दिल्या आहेत. यात बाहुबली झालेल्या प्रभासनेही पोस्ट शेअर केलीय. त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, “हा विजय आहे त्या टीमचा, जिने संपूर्ण देशात आणि परदेशात सिनेमाची जादुई लहर आणली.”

भल्लालदेव ही भूमिका साकारणाऱ्या राणा डग्गुबतीने देखील त्याचं या वेशभूषेतील एक फोटो इंस्टाग्रामवर स्टोरीवर ठेवला आहे.

Photo Courtesy: Instagram/ranadaggubati

दुसरीकडे अनुष्काने प्रभासची पोस्ट रिपोस्ट आणि तमन्नाने ही पोस्ट शेअर केली आहे.

Photo Courtesy: Instagram/anushkashettyofficial

‘बाहुबली: द बिगनिंग’ हा पहिला भाग १० जुलै, २०१५ रोजी प्रदर्शित झाला होता. त्यानंतर २८ एप्रिल, २०१७ ला ‘बाहुबली 2: द कन्क्लूजन’ हा दुसरा भाग प्रदर्शित झाला. या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

बोल्ड एँड ब्युटीफुल! बीचवरील रेतीने माखलेली दिसली दिशा पटानी; बिकिनीतील बोल्ड फोटोचा इंटरनेटवर बोलबाला

बापरे बाप! ‘लूई विटॉन’ ब्रँडच्या महागड्या ड्रेसमध्ये दिसली सोनम कपूर; किंमत वाचून होतील बत्त्या गुल

-ऋचा चड्डाशी लग्न न करण्याबाबत अली फजलने सांगितले ‘मोठे’ कारण; म्हणाला, ‘आम्ही आधी पैसे…’


Leave A Reply

Your email address will not be published.