बापरे बाप! ‘लूई विटॉन’ ब्रँडच्या महागड्या ड्रेसमध्ये दिसली सोनम कपूर; किंमत वाचून होतील बत्त्या गुल


बॉलिवूड अभिनेत्री नेहमीच त्यांच्या हटके फॅशन सेन्स आणि अदाकारीमुळे प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनत असतात. यातील फॅशन सेन्समुळे जबरदस्त चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे सोनम कपूर. केवळ भारतात नाही, तर ग्लोबल सर्कलमध्ये देखील ती तिच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे ओळखली जाते. यातच सोनम कपूरचा आणखी एक क्लासी लूक समोर आला आहे.

सोनमने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती एका वेगळ्याच अंदाजात आणि खास आऊटफिटमध्ये दिसत आहे. (Sonam Kapoor’s classy look viral on social media)

तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये सोनम कपूर सर्वात महाग इंटरनॅशनल ब्रँड ‘लूई विटॉन’च्या एका महागड्या ड्रेसमध्ये दिसत आहे. शेअर केलेल्या या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, सोनम ब्लॅक बटण क्रॉप टॉपमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे. या टॉपच्या कॉलरमध्ये एक स्टायलिश बटण वापरले आहे. त्यामुळे हा टॉप अजून सुंदर दिसत आहे. या सोबतच सोनमने ब्लॅक कार्गो पँट परिधान केली आहे. यासोबत तिने बीज, चंकी बेल्ट यांचा वापर केला आहे.

सोनमने हा लूक आणखी क्लासी बनवण्यासाठी मिडल पार्टिशन करून केसांचा बन घातला आहे. ती या लूकमध्ये खूपच ग्लॅमरस आणि क्लासी दिसत आहे. या सोबतच तिने काळ्या रंगाची लूई विटॉनची बॅग घेतली आहे.

क्लास लूकमध्ये दिसणाऱ्या सोनम कपूरने घातलेल्या या ड्रेसची किंमत देखील तेवढीच महाग आहे. सोनमने घातलेल्या क्रॉप टॉपची किंमत जवळपास 2 लाख रुपये आहे, तर कार्गो पँटची किंमत दीड लाख आहे. तसेच तिने घेतलेल्या बॅगेची किंमत पावणे चार लाख रुपये आहे.

सोनमचा हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र केवळ सोनम कपूरचा लूक आणि तिच्या ड्रेसची चर्चा चालू आहे. तिचा हा क्लासी लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. सगळे कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ऋचा चड्डाशी लग्न न करण्याबाबत अली फजलने सांगितले ‘मोठे’ कारण; म्हणाला, ‘आम्ही आधी पैसे…’

-ओळखा पाहू कोण? सोशल मीडियावर रंगलीय ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याच्या फोटोचीच चर्चा

-चित्रपटगृहातच प्रदर्शित होणार संजय लीला भंसाळीचा ‘गंगुबाई काठियावाडी’; पाहिजे तितकी वाट बघायला निर्मात्यांची तयारी


Leave A Reply

Your email address will not be published.